‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’वर मात करण्याचे आयुर्वेदिक पर्याय

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम फक्त डोळ्यांवर नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. डोळ्यांच्या समस्येसह पाठदुखी आणि मानदुखीदेखील उद्भवू शकते. आयुर्वेदाच्या मदतीने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमवर कशी मात कराल, याबाबत डॉ. निखिल माळी यांनी मार्गदर्शन केलं आहे.

0
2690
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आजकाल अनेक कामं ही कॉम्प्युटरवर होतात. त्यामुळे ऑफिसमध्ये आपण पूर्ण वेळ कॉम्प्युटरसमोर असतो. त्यानंतर जो काही वेळ असतो तो आपला मोबाईलवर जातो. दिवसभर आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल अशा कोणत्या ना कोणत्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर करत असतो आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम.

आयुर्वेदानुसार काही सवयींचा अवलंब केल्यास कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमशी लढा देता येऊ शकतो. फक्त डोळेच नाही तर इतर ज्ञानेंद्रिये आणि संपूर्ण शरीराला संरक्षण देऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही थोडेफार बदल केले तरी तुमच्या डोळ्यांची दृष्टी तुम्ही वाचवू शकता.

1) झोप (निद्रा) – योग्य आणि पुरेशी झोप घ्या. रात्री जागरण आणि दिवसा झोपणं टाळा

2) पाणी शिंपडणे (अक्षी प्राक्षलण) – ही खूप सोपी आणि परिणामकारक अशी पद्धत आहे. दंतधावन म्हणजेच दात घासल्यानंतर तोंडात पाणी भरून ठेवा आणि 5 मिनिटं डोळे बंद करू डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. यामुळे डोळ्यातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडेल.

3) अंघोळ (स्नान) – डोक्यावरून अंघोळ करताना नेहमी थंड पाणी वापरा. गरम पाणी केस आणि डोळ्यांसाठी हानीकारक आहे.

4) काजळ (अंजन) – नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डोळ्यात नेहमी औषधयुक्त असं काजल घाला, डोळ्यांसाठी हे फायदेशीर असतं.

5) नसल ड्रॉप्स (नास्य) – तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तूप किंवा औषधी तेलाचे काही थेंब नाकात घाला.

6) अभ्यंग – ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित तेलाने मसाज करावा. शिरोभ्यंग आणि पादभ्यंग दोन्हीही डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.

7) पादभ्यंग – डोळ्यांचं कार्य सुधारण्यासाठी पायांचं आणि तळव्यांचं अभ्यंग करायलाच हवं. यासाठी औषधी तेलाचा वापर करा.

8) पादप्राक्षलण – बाहेरून आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवावेत

9) पादत्राणधारण – योग्य आणि आरामदायी अशाच चपला वापरा. प्लॅस्टिक चपला वापरू नका. आयुर्वेदानुसार पायाचं आरोग्य सांभाळणे म्हणजे डोळ्यांचं आरोग्य सांभाळण्याचा एक भाग आहे.

10) हातावर हात चोळणे – कॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांना आराम द्यायला विसरू नका. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा आणि बंद डोळ्यांवर ठेवा. या सोप्या पद्धतीमुळे डोळ्यांचं कार्य सुधारेल.

11) आहार – योग्य आणि परिपूर्ण आहार घ्या. नैसर्गिकरित्या भूक, तहान लागल्यास आणि लघवी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून नका.

12) ब्रह्मचार्य – संयम खूप महत्त्वाचा आहे. जास्त लैंगिक संबंध ठेवू नका. आयुर्वेद शुक्रधातूंच्या जतनावर भर देतं कारण यामुळे डोळ्यांचं पोषण होतं.

या सहज सोप्या अशा परिणामकारक अशा सवयींचा अवलंब केल्यास आप आपल्या डोळ्यांना संरक्षण देऊ शकतो. डोळे निरोगी राहण्यास मदत होईल.

हेदेखील वाचा

जाणून घ्या ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’विषयी…

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter