रस्त्यावरील खड्यांमुळे रिक्षाचालकांमध्ये वाढतायेत मणक्याचे विकार

खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवताना सर्वाधिक ताण मणक्याला सहन करावा लागतो. नवी मुंबईतील एका डॉक्टरने रस्त्यांवरील खड्यांमुळे रिक्षा चालकांना होणाऱ्या आजारांवर संशोधन केलं. खड्यांमुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे ३० टक्के रिक्षाचालकांना पाठदुखी आणि मानेचे विकार जडल्याचे आरोग्य विषयक तपासणीतून पुढे आलं आहे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पावसाळ्यात बहुतांश रस्त्यावर खड्डे पडतात. या रस्त्यांवरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागतो. मुळात केवळ रिक्षाचालकंच नव्हे तर अनेकदा या रिक्षांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा त्रास होतो. अशावेळी रुग्ण अस्थिरोगतज्ज्ञांकडे धाव घेतात. गेल्या काही महिन्यात या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

लोकांना होणारा त्रास जाणून घेण्यासाठी नवी मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. शैलेंद्र पाटील यांनी तपासणी केली. या तपासणीत ३० टक्के रिक्षाचालकांना पाठीचा त्रास असल्याची तक्रार समोर आली.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना वाशी येथील वोक्हार्ट रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. शैलेंद्र पाटील म्हणाले की, “रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हाडांच्या दुखापतीत भर पडत आहे. हे लक्षात घेता दोन-तीन महिन्यांपूर्वी अशा रुग्णांचं सर्वेक्षण सुरू होते. त्यानुसार मागील दोन महिन्यांत पाठ व मानेची समस्या घेऊन उपचारांसाठी येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रिक्षाचालकांना पाठ व मणक्याशी संबंधित विकार असल्याचं सामोर आलं आहे.”

डॉ. पाटील पुढे म्हणाले की, “रिक्षा चालकांनाच हा त्रास होतो असं नाही, तर खासगी वाहन चालणाऱ्यांनाही पायावर पडलेल्या ताणामुळे स्नायूंवर परिणाम दिसून येतो. हा आजार मज्जारज्जूशी संबंधित असल्याने फिजिओथेरपीने रुग्णाला बरं करता येऊ शकतं. पण अनेकदा रुग्ण उशीरा उपचारासाठी येतात. अशा प्रकरणात शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. साधारणातः १० ते २० टक्के लोकांना शस्त्रक्रियेशी गरज भासते.”

“या रुग्णालयातील ऑर्थेपेडिकच्या बाह्यरुग्ण विभागात दिवसाला ३० ते ४० रुग्ण येतात. यातील ७० टक्के लोकांना पाठीचा व मणक्याची समस्या असते. यातील ३० टक्के रिक्षा चालक असतात,” असंही डॉ. पाटील म्हणाले.

या रुग्णालयात उपचार घेतलेले रिक्षाचालक अजित पाटील म्हणाले की, “मी दररोज वाशी ते नेरूळ दरम्यान रिक्षा चालवतो. पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला पाठीचे दुखणे त्रास देऊ लागले होते. त्यामुळे रिक्षा चालवता येत नव्हतं. काही दिवसांपूर्वी वोक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी गेलो. तेथील डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले असून मला काही दिवस आरामाचा सल्ला दिलाय”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter