हॉटेलचे पदार्थ किती सुरक्षित… लवकरच दिसणार ‘हायजिन रेटिंग’

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना हायजिन रेटिंग्स देण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण मार्गदर्शक तत्वे तयार करत आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हॉटेल 3 स्टार असो, 5 स्टार असो किंवा 7 स्टार… हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण जे काही खात आहोत ते किती सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आहे, असा प्रश्न आपल्या मनात येतोच. मात्र आता काळजी करू नका, कारण तुम्ही खात असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ किती सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचे आहेत ते तुम्हाला लवकरच समजणार आहे. कारण लवकरच हॉटेलच्या बाहेर तुम्हाला त्या हॉटेलचं हायजिन रेटिंग पाहायला मिळणार आहे.

देशातील नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असं अन्न मिळावं यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने इट राइट इंडिया मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण हॉटेल आणि रेस्टॉरंट्सबाहेर हायजिन रेटिंग लावणं बंधनकारक करण्याची शक्यता आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना हायजिन रेटिंग्स देण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण मार्गदर्शक तत्वे तयार करत आहे. यानुसार या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना हायजिन रेटिंग दिलं जाईल. तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट्समधील ग्राहकांनी सुरक्षित अन्नपदार्थ मिळत आहेत का हे तपासण्यासाठी फूड सुपरवायझरचीही नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी 1,70,000 लोकांना प्रशिक्षण देण्याचा हेतू अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाचा आहे.

या हायजिन रेटिंगमुळे हॉटेल मालकाला आपल्या हॉटेलमधील अन्नपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ग्राहकाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter