निरोगी आरोग्याचे धडे देणारा सापशिडीचा खेळ

पिंपरीतल्या एका रुग्णालयाने सापशिडीच्या खेळाच्या माध्यमातून बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. निरोगी आयुष्य ही शिडी आहे, तर व्यायामाची कमतरता आणि जंकफूड हे आजारांकडून निमंत्रण आहे, हे सांगण्यासाठी सापाचा वापर करण्यात आलाय. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

0
251
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लहानपणी तुम्ही सर्वांनीच सापशिडीचा खेळ खेळला असेल. या खेळात काय होतं, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण, पिंपरी-चिंचवड भागातील एका डॉक्टरने सापशिडीच्या या खेळाचा उत्तम लोकांमध्ये आजारांबाबत जागरूकता पसरवण्याठी वापर केलाय. तुम्हाला बहुदा आम्ही काय सांगतोय यावर विश्वास बसणार नाही. मग, तुम्हीच वाचा..

पिंपरी-चिंचवडच्या देहूरोड भागातल्या आधार रुग्णालयात तुम्ही गेलात, तर तुमचं स्वागत हा बोर्ड करेल. हा बोर्ड पाहून तुम्ही पहिल्यांदा चकीत होता. रुग्णालयात सापशिडी काय करतेय? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण, तो बोर्ड वाचल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांना काय सांगायचंय हे समजेल.

सापशिडीच्या खेळात शिडीच्या घरात तुम्ही आलात तर वर जाता आणि सापाच्या तोंडी गेलात तर खाली येता. तसंच, डॉक्टरांनी आरोग्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केलाय.

निरोगी आरोग्याची शिडी

  • रोजच्या जेवणात फळं आणि हिरव्या भाज्या- कॉलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवतात
  • जेवणात मीठ कमी- उच्च रक्तदाबापासून दूर राहण्यास मदत
  • नियमित व्यायाम- आजारांचा धोका कमी
  • धूम्रपान केलं नाही तर-हृदय चांगलं राहतं

Sapsidi-Insert

तर जालं सापाच्या तोंडी

  • धूम्रपान केल्यास- कॅन्सर होण्याची शक्यता
  • लठ्ठपणामुळे-हृदय विकार होण्याची भीती
  • अनियमित जीवनशैली- पोट आणि वजन वाढणार
  • जंकफूड आणि कोल्डड्रीक्सचं सेवन- मधूमेहाची शक्यता वाढणार
  • बेकरी आणि तळलेल्या पदार्थांचं सेवन- कोलेस्ट्रोल वाढणार

सापशिडीच्या खेळाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या जनजागृतीवर माय मेडिकल मंत्राशी बोलताना आधार रुग्णालयाचे संचालक डॉ. किर्तीकुमार पाटील म्हणतात, “महिन्याभरापूर्वी आम्ही हे पोस्टर रुग्णालयात लावलं. लोकांपर्यंत जीवनशैली आणि आजार याबाबत जागरूक करण्यासाठी. पोस्टरच्या माध्यमातून लोकांना एखादी गोष्ट पटकन समजते. लहान असो वा मोठा प्रत्येक जण या पोस्टरला पाहतोय. याच्या माध्यमातून जनजागृती हाच आमचा उद्देश आहे.”

या पोस्टरच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत काय बदल करायला हवेत याबाबत माहिती देण्यात आलीये.

डॉ. किर्तीकुमार पाटील
डॉ. किर्तीकुमार पाटील

याबाबत आधार रुग्णालयाचे संचालक डॉ. गणेश राऊत म्हणतात, “लोकं आम्हाला या पोस्टरबाबत विचारत आहेत. लोकांना हे पोस्टर खूप आवडलं. याच्या माध्यमातून आम्हाला रुग्णांना एक मेसेज द्यायचा आहे. जीवनशैलीत आताच बदल करा नाहीतर येणाऱ्या काळात आजारांना सामोरं जावं लागेल.”

ड़ॉ. किर्तीकुमार पुढे म्हणतात, “लहानपणी सापशिडीचा खेळ सर्वच खेळतात. म्हणून, लोकांच्या मनावर आजारांबाबत माहिती बिंबावी यासाठी अशा प्रकारचं पोस्टर बनवण्याची कल्पना डोक्यात आली. लोकांना या पोस्टरच्या माध्यमातून सर्वगोष्टी सहज समजत आहेत.”

सापशिडीचा खेळ, हा फक्त खेळ होता. पण, आयुष्य खेळ नाही. आपण जीवनशैलीत बदल केले नाहीत तर येणाऱ्या काळात हृदयरोग, मधूमेह यांसारखे आजार होण्याची शक्यता आहे. देशात हृदयरोग आणि मधुमेहामुळे लाखो लोकं त्रस्त आहेत. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी आपणचं घेणं आवश्यक आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter