मध्यरात्री भूक लागली? मग हे पदार्थ खा…

अनेकदा विद्यार्थ्यांना किंवा तरूणांना रात्री काम किंवा अभ्यासासाठी जागावं लागतं. अशावेळी भूक ही लागतेच. मात्र मध्यरात्री खाणं काहीवेळा घातक ठरू शकतं. अशावेळी तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे हे पदार्थ खावेत.

0
44
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या जेवणाच्या वेळा हमखास चुकतात. परिणामी आपल्याला अवेळी म्हणजे रात्री-अपरात्री भूक लागते. अशावेळी आपण कोणताही विचार न करता खातो. यासाठीच तज्ज्ञांनी, मध्यरात्री भूक लागल्यास काय खावं यांची माहिती दिलीये.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रात्री झोपेच्या अगोदर शक्यतो काहीही खाऊ नये. मात्र जर तुम्हाला मध्यरात्री भूक लागली असेल तर फक्त शरीरासाठी उपयुक्त असणारे पदार्थ खावेत.

यासंदर्भात नारायनीदास मोरबाई बुधरानी ट्रस्टच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर ऋतिका मुरूडकर सांगतात की, “जर तुमच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतील तर तुम्हाला मध्यरात्री भूक लागू शकते. तुमच्या खाण्यात तीन तासासंपेक्षा अधिक कालावधी असेल तर अनेकांना अवेळी खाण्याची इच्छा होते. यामुळे अॅसिडिटी होण्याची शक्यता असते. म्हणून जेवणाच्या वेळा चुकवू नका.”

रात्री भूक लागल्यास हे पदार्थ खा

  • फायबरयुक्त पदार्थ
  • भाजलेल्या नाचणीचे वेफर्स
  • थेपला
  • कुरमुरे
  • ताक
  • लस्सी
  • ग्रीन टी

याबाबात वच्छन आरोग्य केंद्राच्या संचालक आणि आहारतज्ज्ञ अंकिता घाग सांगतात की, “अवेळी भूक लागल्यास कमी प्रमाणात खाणं फायदेशीर ठरेल. त्यामुळे शक्यतो हे पदार्थ खा”

  • दुधासोबत गव्हाचे फ्लेक्स(दुधात साखर घालू नये)
  • उकडलेलं अंड
  • फळं
  • सुकामेवा
  • छोटी वाटी पॉपकॉर्न
  • डार्क चॉकलेटचे दोन तुकडे
  • थालीपीठ
  • प्रोटीन बार
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)