जेवणानंतर लगेच झोपल्याने ‘हे’ होऊ शकतात दुष्परिणाम

दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर झोपायची अनेकांना सवय असते. मात्र ही सवय त्यांना महागात पडू शकते. जेवल्यानंतर किंवा नाष्ता केल्यानंतर लगेच झोपल्यास ते आरोग्यास हानिकारक असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दुपारी जेवल्यानंतर अनेकांना एक छोटी डुलकी घ्यायची सवय असते. त्यामुळे जेवल्यावर लगेच अनेकजण झोपतात. मात्र सावधान असं करणं धोकादायक ठरू शकतं. कारण जेवल्यानंतर, नाष्टा केल्यानंतर किंवा काहीही खाल्यानंतर झोपणं हे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

पचनास अडथळा

जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होतं आणि ते छातीत जातं. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. शिवाय अन्नाचं योग्य पद्धतीने पचन न झाल्यास अनेक आजार जडू शकतात.

वजन वाढणं

आपणं जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणं गरजेचं असतं. यामुळे शरीराचं कार्य उत्तम राहण्यास मदत होतं. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर, कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

अॅसिडीटी

जेवल्यावर तातडीने झोपल्याने पोटात आम्ल तयार होतं. यामुळे अॅसिडीटी होण्याची दाट शक्यता असते. अॅसिडीटीमुळे शरीरालाफार त्रास होतो शिवाय झोपही लागत नाही.

हृदयासंबंधीचे आजार

जेवल्या जेवल्या झोपल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे हृदयावर परिणाम होऊन त्यासंबंधीचे आजार बळावू शकतात. त्यामुळे जेवल्यावर तातडीने झोपू नये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter