‘या’ टीप्सने तुमचा प्रवास होईल सुखाचा!

प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. प्रवासादरम्यान कोणत्याही समस्या उद्भवू नये यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणं फायदेशीर ठरेल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गाडीने घेऊन लांब पल्ल्याचे प्रवास करताना आपण प्रत्येक गोष्टीचं भान ठेऊन बाहेर पडतो. यामध्ये आरोग्याची काळजी घेणंही तितकचं महत्त्वाचं असतं. प्रवासादरम्यान आरोग्याची नेमकी कशी काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञांनी काही टीप्स सांगितल्यात.

बॉम्बे रूग्णालयाचे डॉक्टर गौतम भंसाली यांनी प्रवासादरम्यानच्या काही टीप्स दिल्यात

 • प्रवास करण्याच्या आधी दोन रात्री कमीत कमी सात तासांची झोप घ्या
 • गाडी जास्त वेगाने चालवू नका
 • गाडी चालवताना मोठ्याने गाणी लावू नका यामुळे लक्ष वेधलं जातं
 • १००-१५० किलोमीटरनंतर १५-२० मिनिटांचा ब्रेक घ्या. थोडंसं चाला
 • जर तुम्हाला झोप येत असेल तर २०-३० मिनिटांची झोप घ्या
 • गाडी चालवताना ताठ बसा

प्रवासादरम्यान या गोष्टीसोबत आहाराच्या दृष्टीने विचार करणंही गरजेचं आहे. यासाठी वच्छन आरोग्य क्लिनिकच्या डॉ. अंकिता घाग यांच्या सांगण्यानुसार,

 • घरी बनवलेले पदार्थ शक्यतो प्रवासादरम्यान खा. जसं की, थेपले, मेथी पराठे
 • सुका खाऊ म्हणून तुम्ही खाकरा, भाजलेले शेंगदाणे किंवा चणे यांचा पर्याय निवडू शकता
 • जर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये खात साल तर पचायला हलके असतील असे पदार्थ खा
 • मद्यपान करणं टाळा

असिडीटीचा त्रास टाळण्यासाठी

 • थोड्या-थोड्या वेळाने काहीतरी खात रहा
 • काकडीचे तुकडे किंवा फळं तुम्ही खाऊ शकता

भरपूर पाणी प्या

 • भरपूर पाणी प्या. जास्तवेळ तहानलेले राहू नका
 • पाणी पिण्याव्यतिरिक्त कलिंगडाचा रस, नारळपाणी आणि लिंबू सरबत तुम्ही पिऊ शकता
 • गाडीत एकतरी पाण्याची बाटली ठेवत जा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter