माणसांचा जीव स्वस्त झालाय, विरेंद्र सेहवागचा संताप

विरेंद्र सेहवाग हा नेहमी आपल्या बेधडक व्यक्तव्यांसाठी ओळखला जातो. एलफिस्टन ब्रीज चेंगराचेंगरी संदर्भात देखील सेहवागनेे आपलं मत व्यक्त करत सध्या लोकांचा जीव स्वस्त होत असल्याचं सांगितलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मायानगरी मुंबईत शुक्रवारी सकाळी निष्पाप चाकरमान्यांवर काळाने घाला घातला. चेंगराचेंगरीत 22 प्रवाश्यांचा मृत्यू झाला, तर ३९ प्रवासी जखमी झाले.

मुंबईतील या दुखःद दुर्घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केलीये. भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग आपलं मत बेधडकपणे व्यक्त करतो. शुक्रवारच्या घटनेनंतरही सेहवागने ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं. सेहवागने ट्विटमध्ये विचारलेला प्रश्न प्रत्येक मुंबईकराचा आहे.

SEHWAG

ही अत्यंत दुदैवी गोष्ट आहे की, माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय. ही खूप दुखःद घटना आहे. टॅक्स भरून सुद्धा निष्पापांचा जीव जातो.

मी या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती सांत्वन व्यक्त करतो. प्रवाश्यांची काही चूक नसतानाही त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

स्वप्नांच्या या शहरात. माणसं अशा प्रकारे धोका पत्करून प्रवास करतात. लोकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. जी गोष्ट गेली कित्येक वर्ष दुर्लक्षितच आहे.

विरेंद्र सेहवागने उपस्थित केलेेला प्रश्न आज लाखों मुंबईकरांच्या मनातला आहे. दररोज ७० लाख प्रवासी मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी. रेल्वेमंत्री मुंबईचा असला तरीही मुंबईच्या वाट्याला काहीच येत नाही. आम्ही टॅक्स भरतो, पण गुरा-ढोरांसारखा प्रवास आमच्या वाटेला का? असा प्रश्न मुंबईकर विचारतायत. विरेंद्र सेहवागने मुंबईकराच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्याला वाचा फोडलीये.

सुरक्षेचा हा प्रश्न मुंबईकरांनी प्रशासनाला अनेकदा विचारला. पण, प्रशासनाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्यामुळे मुंबईकरांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करण्यापलिकडे दुसरा पर्याय नाहीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter