नवा शोध- त्वचेचा तुकडा कमी करणार लठ्ठपणा

सिंगापूरच्या संशोधकांनी एक खास त्वचेचा तुकडा तयार केलाय ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होणारे. सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञांन विद्यापीठातील संशोधकांनी हा त्वचेचा तुकडा १०० मायक्रो निडल्स वापरून तयार केलाय. या त्वचेच्या तुकड्याने पोटाजवळील चरबी कमी होईल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारणं, आता तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएट, एक्सरसाईज किंवा गोळ्या घ्याव्या लागणार नाहीयेत. कारणं, सिंगापूरच्या संशोधकांनी एक खास त्वचेचा तुकडा तयार केलाय ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञांन विद्यापीठातील संशोधकांनी हा त्वचेचा तुकडा १०० मायक्रो निडल्स वापरून तयार केलाय. ज्यामुळे लोकांचं कमी वेळेत वजन कमी होण्यास मदत होईल. या त्वचेच्या तुकड्याने पोटाजवळील चरबी कमी होईल. या तुकड्याच्या माध्यमातून शरीरासाठी घातक असणाऱ्या व्हाईट फॅटचं रूपांतर ब्राऊन म्हणजे चांगल्या फॅटमध्ये होणार आहे.

हे संशोधन जर्नल स्मॉल मेथड्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय. संशोधनासाठी संशोधकांनी या त्वचेच्या तुकड्याचा उंदरावर प्रयोग केला.

अनेकदा लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियांचे शरीरावर दुरुपयोगही पाहायला मिळतात. यासाठीच चेन्झे सू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा त्वचेचा तुकडा तयार केलाय. ज्यामुळे ब्राऊन फॅटचं प्रमाण वाढून वजन कमी होण्यास मदत होईल.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, हा त्वचेचा तयार केलेला तुकडा त्वचेवर किमान दोन मिनिटं लावायचा. त्यानंतर यामध्ये लावण्यात आलेल्या निडल्सद्वारे औषधं शरीरात जाऊन व्हाईट फॅटचं रूपांतर ब्राऊन फॅटमध्ये होणार आहे.

उंदरांवर हा प्रयोग करताना त्यांना ४ आठवडे चांगला आहार देण्यात आला.

या संशोधनाचे अभ्यासक चेन्झे सू यांच्या सांगण्यानुसार, “जेव्हा आम्ही या त्वचेच्या तुकड्याचा उंदरावर प्रयोग केला तेव्हा ५ दिवसांनंतर उंदरामध्ये ब्राऊन फॅट्स वाढले होते. आणि ज्यामुळे अतिरिक्त चरबी वाढण्यामध्ये घट झाली.”

संशोधकांनुसार, उंदरामध्ये फॅट्स वाढण्याचं प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झालं होतं.

सू पुढे म्हणाले की, “या त्वचेच्या तुकड्यात आम्ही जे औषधं वापरलं ते औषधं तोंडाद्वारे तसंच इंजेक्शनद्वारे घेता येतं. मात्र या त्वचेच्या तुकड्यामध्ये या औषधाचं प्रमाण कमी असल्याने त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.”

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, लठ्ठपणा कमी कऱण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

सोर्स- मेडिकल न्यूज टुडे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter