#Savethedoctors – आंदोलनाला पाठिंबा द्या, पुणे IMAचं नागरिकांना आवाहन

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 17 जून, 2019 ला इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे आणि या आंदोलनाला वैद्यकीय क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातील लोकांनीही पाठिंबा द्यावा, असं आवाहन पुणे आयएमएने केलं आहे.

0
831
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कोलकात्यातील डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केलं. देशातील बहुतेक सरकारी रुग्णालयातील आणि खासगी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 17 जून, 2019 ला इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे आणि या आंदोलनाला वैद्यकीय क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातील लोकांनीही पाठिंबा द्यावा, असं आवाहन पुणे आयएमएने केलं आहे.

पुणे आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, “आम्ही नॉन मेडिको प्रोफेशनल्स आणि हाऊसिंग सोसायटीना आमच्या आंदोलनाला समर्थन देण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही संस्थेला आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकतात आणि जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी त्यांचं योगदान येऊ शकतात. जितके जास्तीत जास्त लोक आम्हाला पाठिंबा देतील तितकी डॉक्टरांवरील हिंसाचाराबाबत जनजागृती होण्यास मदत होईल”

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (COEP), BITS-पिलानी स्टुडंट युनियन यासारख्या अनेक संस्थांनी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

COEPचे विद्यार्थी समीर साठे म्हणाले, “माझे शाळेत जितके मित्र होते, त्यापैकी अनेक जण आता वैद्यकीय क्षेत्रात आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा भीतीच्या दडपणात न राहता आरोग्य सेवा पुरवणं किती महत्त्वाचं आहे याची कल्पना आम्हाला आली. मात्र डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यांमुळे पूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे आम्ही डॉक्टरांच्या आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter