सचिन तेंडुलकरकडून मुंबईकरांना स्वच्छतेचे धडे

कचरा रस्त्यावर न टाकता घरात टाका. प्रत्येकाने बदल घडवणं गरजेचं आहे. दुसऱ्यांचा दोष दाखवताना स्वत:कडे देखील पाहिलं पाहिजे. असं म्हणत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांना स्वच्छतेचा मंत्र दिलाय.त

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात तो म्हणजे सचिन तेंडुलकर, आता मुंबईकरांना आरोग्याचे धडे गिरवण्यास शिकवणार आहे. सचिनला क्रिकेटच्या मैदानावर सर्वांनीच पाहिलंय. पण, समाजकार्यातही खासदार सचिन तेंडुलकर मागे नाही.

‘अपनालय’ या सामाजिक संस्थेने मुंबई महापालिकेसोबत मिशन-२४ ही मोहीम सुरू केलीये. मुंबईकरांचा लाडका सच्चू, या मोहिमेचा चेहरा असणार आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील एम-ईस्ट भागात लोकांना मुलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.

Sachin-Tendulakr-Mumbai-Insert

सचिन तेंडुलकर आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीनंतर मिशन-२४ या मोहिमेबाबत माहिती देण्यात आली.

प्रसारमाध्यमांना या मोहिमेबाबत माहिती देताना सचिन तेंडुलकर म्हणाला, “प्रत्येकाने कचरा घरातच टाकला पाहिजे. आपण रस्त्यावरून जाताना गाडीतून कचरा बाहेर टाकतो. याची गरज काय? घरी येऊनही कचरा टाकता येतो. कचरा व्यवस्थापन ही सर्वांची जबाबदारी आहे. कचऱ्याबाबत मुंबईकरांनी लक्ष दिलं पाहिजे.”

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर

सचिन पुढे म्हणाला, “दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत: काय करतो याकडे लक्ष दिलं पाहीजे. एक बोट दुसऱ्यांकडे दाखवताना तीन बोटं स्वत:कडे असतात, हे विसरू नका.”

‘अपनालय’च्या या मिशन-२४ मोहिमेला मुंबई महापालिका मदत करणार आहे. या मोहिमेत एम-ईस्ट विभागातील सर्व झोपडपट्टया दत्तक घेऊन सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण करण्याचा उद्देश या संस्थेचा आहे. एम-पूर्व विभागातील शाळा, गटारं, आरोग्यसेवा, सुरक्षा आणि पाणी यांसारख्या विषयांवर ही संस्था लक्ष देणार आहे.

मुंबईमध्ये सध्या कचरा ही खूप मोठी समस्या निर्माण झालीये. मुंबईत दररोज हजारो टन कचरा जमा होतो. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रस्त्यावर जमा कचऱ्यामुळे मुंबईकरांचं आरोग्यही धोक्यात येतं. त्यामुळे मोठ्या सोसायटींनी कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करावी, असं आवाहनंही यावेळी करण्यात आलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter