पुण्यात रोबोटीक पद्धतीने किडनी स्टोनवर उपचार

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी एक महिलेच्या किडनी स्टोनची शस्त्रक्रिया रोबोटीक पद्धतीने केलीये. डॉक्टरांचा दावा आहे की पुण्यातली आणि राज्यातील ही रोबोटीक पद्धतीने केलेली पहिली शस्त्रक्रिया असावी

0
52
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

३५ वर्षीय अश्विनीला (नाव बदललेलं) किडनीचा आजार होता. किडनीत खडे, म्हणजेच स्टोन तयार झाले असल्याने गेले काही वर्ष अश्विनीला असह्य वेदना होत होत्या. यावर उपचारांसाठी ती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाली.

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, अश्विनीच्या किडनीतील खडे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने काढता आले असते. पण, डॉक्टरांनी अद्ययावत रोबोटीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अश्विनीवर उपचार केले. डॉक्टरांचा दावा आहे की, किडनी स्टोन काढण्यासाठी बहुदा पुण्यात आणि राज्यात रोबोटीक पद्धतीचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला असावा.

साल २०११मध्ये अश्विनीला पहिल्यांदा किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला. पण, औषधं घेतल्यानंतर दुखणं कमी झालं आणि डॉक्टरांनी अश्विनीला स्टोन न काढण्याचा सल्ला दिला. पण, दुखणं पुन्हा वाढल्याने अश्विनीने किडनीतील खडे काढून टाकण्याचा निर्णय़ घेतला.

डॉ.हिमेश गांधी
डॉ.हिमेश गांधी

माय मेडिकल मंत्राशी बोलताना रुबी हॉल रुग्णालयाचे किडनी विशेषज्ञ डॉ. हिमेश गांधी म्हणतात, “रोबोटीकच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्याने रक्त कमी वाया जातं. रुग्णाला जास्त त्रास सहन करावा लागत नाही. रोबोटीक तंत्रज्ञान विकसित असल्याने अचूक शस्त्रक्रिया पार पडते.”

अश्विनीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या टीम मधील डॉ. शिरीष यांडे, म्हणतात, “रोबोटीक पद्धतीत आम्हाला किडनी स्टोन पूर्ण बाहेर काढणं शक्य होतं. स्टोनचे तुकडे करावे लागत नाहीत. सामान्य शस्त्रक्रियेत आणि लॅप्रोस्कॉपीत हे शक्य होत नाही. आम्ही रुग्णाला तीन दिवसांत डिस्चार्ज दिला आणि तिचा सहा आठवड्यांचा वेळ वाचला.”

डॉ. शिरीष यांडे
डॉ. शिरीष यांडे

किडनी स्टोन काढल्यानंतर अश्विनी आता खूप आनंदात आहे. माय मेडिकल मंत्राशी बोलताना अश्विनी म्हणते, “मी आता पुन्हा काम सुरू करणार आहे. रोबोटीक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मी ही शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. आता मला अजिबात दुखत नाही.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)