अशी करा लठ्ठपणावर मात

लठ्ठपणाची कारणं आणि लक्षणं वेळीच माहिती असल्यास त्यावर मात करता येऊ शकते. याबाबत हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉ. शरद शर्मा यांनी मार्गदर्शन केलंय.

0
703
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लठ्ठपणाची कारणं समजून घेणं आणि भविष्यात होणाऱ्या अति लठ्ठपणावर आळा घालण्यासाठी स्वत:च काही पावलं उचलणं गरजेचं आहे. लठ्ठपणा 3 भागात विभागला जाऊ शकतो. अति वजन, लठ्ठपणा आणि अति लठ्ठपणा.

अति वजन आणि लठ्ठ भारतीयांची संख्या वाढतेय, त्याच प्रमाणात अति लठ्ठपणा असलेल्यांची संख्याही वाढतेय. आपण सर्व अशा समाजात राहतो, जिथं आपली शारीरिक ठेवण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जी लोकं अति लठ्ठ असतात त्यांच्यात न्यूनगंडता येते, ते स्वत:ला कमी लेखतात.

लठ्ठपणामुळे एखाद्या व्यक्तीचं समाजातील स्थान, नातेसंबंध, मित्र परिवार यावरही परिणाम होतो. स्वत:बाबत नकारात्मक भावना निर्माण होते आणि त्याचा परिणाम वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यावरही होतो. आपण सर्व अशा परिस्थितीतून जातो, जिथं आपली पँट किंवा ड्रेस अचानाक आपल्याला घट्ट वाटू लागतो. जिने चढणं जे आपल्याला सोपं वाटायचे, तेच जिने एखादा डोंगर चढल्यासारखे वाटतात.

एखाद्याला दिवसभर थकवा जाणवतो, हिप आणि पाठीत वेदना होतात. देशात आरोग्याच्या समस्या वाढताहेत. एका अभ्यासानुसार 2015 साली सुमारे 15% भारतीय लठ्ठ होते. मुख्यत: बैठी आणि विचित्र जीवनशैली यामुळे हा आकडा झपाट्यानं वाढतोय.

गेल्या काही वर्षांपासून सडपातळ आणि योग्य शरीररचना ही सौंदर्याची मानकं म्हणून ओळखू जाऊ लागलीत, एक आव्हान समजलं जाऊ लागलंय. योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळे हे आव्हान गाठणं म्हणजे एक प्रकारे रिवार्डच आहे.

मात्र अशा समजांमुळे भेदभाव निर्माण होतो आणि त्यामुळे लठ्ठ किंवा अति वजन असलेल्या लोकांच्या मनात नकारात्मकता निर्माण होते. एखाद्या व्यक्तीचं आरोग्य मोजलं किंवा पारिभाषित केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे व्यक्तीचं वजन किंवा तो कसा दिसतोय यावरून त्या व्यक्तीचं आरोग्य कसं आहे, हे सांगता येत नाही. अशी अनेक सडपातळ व्यक्ती आहेत ज्यांची जीवनशैली आरोग्यासाठी चांगली नाहीये, तरी त्यांचं वजन वाढत नाही. कारण या गोष्टी व्यक्तीनुसार वेगवेगळ्या असतात.

त्यामुळे जे लोकं लठ्ठ आणि जास्त वजनाचे आहेत त्यांनी सुरुवातीला त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत. आहारवर नियंत्रण ठेवा, नियमित व्यायाम करा आणि ताणतणाव घेणं टाळा. तसंच लठ्ठ व्यक्तीचं कुटुंब आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना लठ्ठ म्हणून हिणवणं किंवा दोष देऊ नका. त्याऐवजी त्यांना वजन कमी करण्यात मदत करा. सकारात्मकता आणि कुटुंब, मित्रांकडून मिळणारं प्रोत्साहन यामुळे शरीराचं वजन योग्य प्रमाणात येण्यास मदत होईल.

सध्या लठ्ठपणाचं प्रमाण मोठ्या प्रणात वाढतंय. त्यामुळे उशिर होण्यापूर्वीच याबाबत जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. एखादा व्यक्तीच वजन जास्त असण्यास किंवा लठ्ठ असण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

त्यापैकी खालील कारणं लक्षात ठेवा.

  • झोपेची समस्या
  • हृदयासंबंधित आजार
  • रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल पातळीत वाढ
  • सांधेदुखी
  • कॅन्सर होण्याची शक्यता
  • लैंगिक आरोग्याची समस्या
  • किडनी आणि यकृताची समस्या
  • अस्थमा होणं
  • मासिक पाळीची समस्या

त्यामुळे तुमच्या डॉक्टरांची मदत घ्या. तसंच आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेलं वजन मिळवता येईल. शरीराचं वजन नियंत्रणात ठेवणं शक्य आहे आणि तुम्ही ते शक्य करून दाखवाल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter