चर्चेतून मुलांना दाखवा योग्य दिशा

लहान मुलं निरागस असतात. मुलं आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी पाहात असतात, ऐकत असतात. आणि त्याचे आपल्यापरीने अर्थही लावत असतात. पण या घटनांचे, बातम्यांचे योग्य अर्थ मुलांनी लावावेत यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे.

चर्चेतून मुलांना दाखवा योग्य दिशा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सध्या स्मार्टफोनमुळे जग जवळ आलंय. त्यातच आता सोशल मीडिया, व्हॉट्सअप, वेबसाईट, ऑनलाईन अॅपमुळे अनेक घटना घरबसल्या कळतात. सध्या मुलांच्या हातात नेहमीच स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप असल्याने त्यांना चांगल्या आणि वाईट अशा सर्वच बातम्या कळतात. नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला, लढाई याबद्दल विचार करून ते अनेक प्रश्नही विचारतात. पण या प्रश्नांना नेमकी काय उत्तरं द्यायची याबाबत पालकांना संभ्रम आहे.

यासंबंधी बोलताना वॉशिंगटनमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मेगान मोरेगो सांगतात की, “सध्या आपल्याला ज्या प्रकारच्या बातम्या उपलब्ध होत आहेत, त्या प्रकारांमुळे लहान मुलांच्या महितीवर परिणाम होताना दिसतोय.”

डॉ. मेगान यांच्या मते, यासाठी पालकांनी मुलांसोबत बसून व्यावसायिक पत्रकारांच्या निवडक बातम्या पाहणे गरजेचे आहे. सध्या आपल्याला फोनवर सर्व प्रकारच्या बातम्या उपलब्ध होत असल्याने मुलं काहीही पाहतात. त्यापेक्षा काही खास बातम्या मुलांना दाखवून त्यावर चर्चा घडवून आणावी.

लहान मुलांना काय कळते, असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. पण खरंतर त्यांना बऱ्याच गोष्टी समजत असतात. ‘द पेशंट पेज’ने केलेल्या सर्वेनुसार, एखाद्या घटनेबाबत तुम्ही त्यांना विचारले तर, त्यांना त्याबाबत नक्कीच माहिती असते. कदाचित तुम्हाला त्यांची उत्तरं ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल.

साऊथ कॅलिफोर्निया युनिवर्सिटीचे डॉक्टर डेव्हिड श्कॉनफेल्ड सांगतात की, “जेव्हा पालक मुलांना असे प्रश्न विचारतात तेव्हा, असं समजतं की आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करत नाही त्यातील बऱ्याच गोष्टी मुलांना माहिती असतात. मुलं त्याची चिंताही करत असतात.”

वयात येणाऱ्या मुलांनी वेदनादायक किंवा धक्कादायक बातम्या शक्यतो पाहू नये. आणि पाहिल्यास त्या बातम्यांवर पालकांनी मुलांशी चर्चा करावी. त्यांना अशा बातम्या समजावून सांगा. असे आढळून आले आहे की, तरुण मुलं अशा घटना पाहिल्यानंतर सुरक्षेसंबंधी अधिक प्रश्न विचारतात. अशावेळी पालकांनी त्यांना वास्तविकता आणि काल्पनिकता यांच्यातील फरक स्पष्ट करून दिला पाहिजे.

ज्या मुलांना अशा धक्कादायक बातम्यांचा/गोष्टींचा त्रास होतो त्यांना झोपेच्या समस्या निर्माण होतात. काहींना डोकेदुखी, पोटदुखी अशा शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यांच्या वागण्यातही बदल झालेला दिसून येतो. अशावेळी पालकांनी जरूर बालरोगतज्ज्ञांची मदत घ्यावी.

लहान मुलांच्या मनात काय चिंता आहेत, याविषयी जाणून घेऊन त्यावर चर्चा करा, असे मत डॉक्टर डेव्हिड श्कॉनफेल्ड मांडतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)