सतत पाय हलवताय? वेळीच डॉक्टरांना दाखवा

अनेक जणांना बसल्यावर नकळपणे पाय हलवण्यासाठी सवय असते. याला रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हणतात. या सिंड्रोममध्ये एखाद्या व्यक्तीला सतत पाय हलवण्याची सवय लागते.

0
252
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ए पाय हलवू नको. असं आपणं कित्येकदा आपल्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तीला सांगतो. सतत पाय हलवण्याची सवय ही अनेक लोकांना असते. तुम्हाला देखील सातत्याने पाय हलवण्याची सवय आहे तर, सावधान. कारणं, तुम्हालाही रेस्टलेस लेग सिंड्रोम असू शकतो. यामध्ये व्यक्तीला सातत्याने पाय हलवण्याची सवय असते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घरगुती उपचारांनी, जीवनशैलीतील बदलाने तसंच औषधोपचारांमार्फत या रेस्टलेस लेग सिंड्रोमवर उपचार करता येऊ शकतात.

मुंबईतील मानसशास्त्रज्ञ आरती श्रॉफ सांगतात की, “रेस्टलेस लेग सिंड्रोम हा न्यूरो मोटर आणि स्लीप-वेक डिसॉर्डर यांच्या यादीत मोडतो. या सिंड्रोममध्ये एखाद्या व्यक्तीला सतत पाय हलवण्याची सवय लागते. काही व्यक्तींमध्ये ही समस्या वारंवार होत असल्याने त्यांना झोपेतही अडथळा निर्माण होतो.” डॉ. श्रॉफ यांनी या समस्येसंदर्भात काही कारणं आणि उपाय सांगितली आहेत.

कारणं

  • पाय हलवण्याची समस्या पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. आनुवांशिकरित्या ही समस्या निर्माण होऊ शकते.
  • जर एखाद्या व्यक्तीने दीर्घ काळ पाय स्थिर ठेवले तर ही समस्या निर्माण होते.

उपचार

  • अशा व्यक्तींनी या समस्येसाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा

बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भंसाली सांगतात की, “अति प्रमाणात मद्यपान केल्याने रेस्टलेस लेग सिंड्रोम ही समस्या होऊ शकते. मधुमेही आणि पार्किनसन रूग्णामध्ये प्रामुख्याने हा सिंड्रोम पहायला मिळतो. या सिंड्रोम बरा व्हावा यासाठी एक्सरसाईज, पायांना मसाज, स्ट्रेचिंग करावं. त्यासोबतचं मद्यपान आणि कॉफी यांचं प्रमाण कमी ठेवावं. या समस्येसाठी औषोधपचार देखील उपलब्ध आहेत.”

गुरगावच्या पारस रूग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राजेश कुमार सांगतात की, “आर्यन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे रेस्टलेस लेग सिंड्रोम होण्य़ाची शक्यता आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सप्लिमेंट घेतल्याने यावर उपचार करता येऊ शकतो.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter