नेत्रदान करायचंय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

ऑर्गन इंडियाच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज असते, पण अवयवदानाच्या माध्यमातून फक्त पन्नास हजार कॉर्नियाच उपलब्ध होतात. नेत्रदानाची संख्या वाढली पाहिजे. नेत्रदान कऱण्याबाबतच्या काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डोळे दान करण्याची संख्या कमी असल्याने भारतात केवळ 10 टक्के डोळा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पार पडतात. देशात जवळपास 1.5 दशलक्ष लोकांना अंधत्वाची समस्या असते. ज्यापैकी 80 टक्के लोकं या समस्येतून मुक्त होऊ शकतात. कॉर्नियल ब्लाईंडनेसवर डोळा प्रत्यारोपणाद्वारे देखील उपचार होणं शक्य आहे. मात्र डोळे दान करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक जण प्रतीक्षा यादीत आहेत.

नॅशनल आय डोनेशनच्या मते, डोळे दान करणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी याबाबत जनजागृती होणं फार गरजेचं आहे. जेणेकरून लोकं स्वतः पुढाकार घेऊन डोळे दान करतील.

नेत्रदान करण्याबाबच्या या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.

 • केवळ मृत्यूनंतर नेत्रदान करता येतं
 • व्यक्तीने नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली नसेल तरीही त्या व्यक्तीचे मृत्यूनंतर डोळे दान करता येऊ शकतात
 • नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीची तसंच ज्या व्यक्तीला हे डोळे दान करण्यात आलीये अशा दोन्ही लोकांची माहिती गुपित ठेवण्यात येते
 • जर आपत्कालाीन परिस्थिती असेल तर प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णांना प्राधान्य दिलं जातं
 • नेत्रपेढीच्या देखरेखीखाली असलेल्या यादीनुसार डोळे एखाद्या व्यक्तीला दान करता येतात
 • केवळ नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरांकडून डोळे दान करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते
 • व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 6 ते 8 तासांच्या आत डोळे दान करावे लागतात
 • डोळे दान करण्याची प्रक्रिया ही केवळ 10-15 मिनिटांची आहे.
 • डोळे दान केल्यानंतर चेहऱ्यावर कोणतीही खूण राहत नाही
 • एका व्यक्तीच्या डोळे दानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते
 • पुरूष किंवा महिलांचे वयाच्या कोणत्याही वर्षी मृत्यूनंतर डोळे दान केले जाऊ शकतात
 • डोळे दान करण्यासाठी रूग्णाच्या कुुटुंबियांना कोणताही खर्च येत नाही
 • मधुमेह, हायपरटेन्शन, अस्थमा या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter