का रात्री झोपल्यावर अचानक जाग येते?

प्रत्येक व्यक्तीला रात्रीची किमान 7 ते 9 तासांची झोप मिळणं गरजेचं आहे. मात्र अनेकदा रात्री झोपल्यावर आपल्याला जाग येते. जाणून घ्या रात्री झोपल्यावर अचानक का जाग येते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

काल झोपंच पूर्ण नाही झाली…आजकाल ना रात्री सतत जाग येते आणि झोपमोड होते. अनेकदा आपल्या बाबतीतही असं घडत असेल. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या दिवशीच्या कामाला लागतो. प्रत्येक व्यक्तीला रात्रीची किमान 7 ते 9 तासांची झोप मिळणं गरजेचं आहे. मात्र अनेकदा रात्री झोपल्यावर आपल्याला जाग येते. जाणून घ्या रात्री झोपल्यावर अचानक का जाग येते.

चिडचिडेपणा किंवा पॅनिक अटॅक

ज्या व्यक्तींना चिडचिडेपणा किंवा पॅनिक अटॅकची समस्या असते त्या व्यक्तींना झोपेसंदर्भातील समस्या असण्याची शक्यता असते. मात्र या समस्या सामान्यपणे दिसून येत नाही. जर तुम्ही झोपेच्या अगोदर कोणत्यातरी गोष्टीचा फार विचार करत झोपला असाल तर तुम्हाला ही समस्या उद्भवण्याची समस्या येण्याची शक्यता असते.

लघवीला सतत होत असल्यास

रात्री तुमचं मूत्राशय (bladder) योग्यरित्या रिकामं झालं नसल्यास सतत लघवीला जाण्याची समस्या समोर येऊ शकते आणि त्यामुळे रात्री तुम्हाला झोपेतून जाग येऊ शकते. अशी समस्या प्रामुख्याने मधुमेही रूग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. शिवाय ज्या व्यक्तींना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास असतो त्यांना देखील ही समस्या जाणवते.

स्लिप अॅप्निया 

स्लिप अॅप्निया हा झोपेसंदर्भातील आजार असून सामान्यपणे हा आजार दिसून येतो. या समस्येमध्ये रूग्णांना रात्रीची जोप लागत नाही शिवाय झोपेतून जाग येण्याचीही समस्या उद्भवते. स्लिप अॅप्निया ही परिस्थिती फार गंभीर बनू शकते त्यामुळे यावर वेळीच इलाज करणं फायदेशीर ठरतं.

मद्यपान

जर तुम्हाला रात्री सतत झोपेतून जाग येत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी मद्यपान केलं असल्याची शक्यता आहे. झोपण्यापूर्वी मद्यपान केल्याने झोपेच्या समस्या उद्भवण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter