…म्हणून दररोज एक फळ खावं

दररोजच्या आहारासह फळांचं सेवन करणंही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हेल्दी आहारात फळांचा समावेश असायलाच हवा. दररोज जेवण जसं करतो, तसं दररोज एक फळही खायला हवं. फळात सोडियम, कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल कमी असतं, मात्र व्हिटॅमिन्स, न्यूट्रिअन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.

फळं खाण्याचे फायदे

 • विविध प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळतं
 • गंभीर आजार बळावण्याचा धोका कमी होतो
 • हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो, हृदय निरोगी राहतं.
 • पोटॅशिअम असलेल्या फळांचं सेवन केल्यानं हाडांना हानी पोहोचत नाही, किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होत
 • फळांमध्ये फायबर भरपूर असतं, ज्यामुळे शौचास साफ होतं, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणिम टाईप 2 मधुमेहापासून संरक्षण मिळते.
 • लठ्ठपणावर मात करण्यासाठीदेखील फळं फायदेशीर आहेत
 • पोट भरलेलं राहतं, कॅलरीज कमी असतात
 • व्हिटॅमिन सी युक्त आणि अँटिऑक्सिडंट युक्त फळं खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हेल्दी पेशी वाढतात.
 • फळांमधील फॉलिक असिड लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यास मदत करतात.
 • नियमित फळांचं सेवन केल्यानं व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण मिळतं.
 • सर्दी, खोकला ताप यांचा धोका कमी होतो.
 • फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते.
 • जंकफूडला फळं हा चांगला पर्याय आहे.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here