ग्रामीण भागात काम कराल? तरच १० टक्के राखीव कोट्यातून प्रवेश

डॉक्टर ग्रामीण भागात काम करण्यासाठी तयार होत नाहीत. यासाठीच सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या इच्छुकांसाठी १० टक्के राखीव जागा ठेवण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आण् संशोधन संचलनालयाने वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवलाय

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे. या कायद्यासाठीचा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालाने वैद्यकीय शिक्षण विभागाकड़े पाठवला आहे.

वैद्यकीय संचलनालयाच्या प्रस्तावानुसार

  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील १० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील
  • या जागांसाठी एक वेगळी मेरीट लिस्ट लावण्यात येईल
  • जे विद्यार्थी १० वर्ष ग्रामीण भागात काम करण्यासाठी तयार असतील त्यांची ही लिस्ट असेल
  • या विद्यार्थ्यांना सरकारकला १० वर्षांचा बॉन्ड लिहून द्यावा लागेल
  • या विद्यार्थ्यांना या १० टक्के कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल

ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या भरून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने हा प्रस्वात वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

नव्या कायद्याच्या या प्रस्तावाबाबत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे म्हणतात, “आम्ही एका नवा प्रस्वात वैद्यकीय शिक्षण विभागाला दिलाय. हा नवा कायदा झाल्यास सरकारला ग्रामीण भागात काम करण्यासाठी जवळपास २५० डॉक्टर उपलब्ध होतील. ज्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टरांची अपूरी संख्या भरून काढण्यास मदत होईल. आम्ही याबाबत मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाशी देखील चर्चा केलीये. ”

ग्रामीण भागात डॉक्टरांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. राहण्यासाठी चांगली जागा नाही, काम करण्याच्या जागेत सुविधा नाहीत. त्यामुळे डॉक्टर्स ग्रामीण भागात काम करण्यास तयार होत नाहीत. परिणामी डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अतिदुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळत नाहीयेत. वैद्यकीय सुविधा मिळालेल्या रुग्णांचे हाल होतायत.

ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी हा नवा प्रस्ताव आखण्यात आलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)