अवयवदानाच्या जनजागृतीसाठी डॉक्टर काढणार सायकल रॅली

अवयवदानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी अनेक स्तरांवरून विविध प्रकारे जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे कर्नाटकात एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्यात येणारे.

0
622
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अवयवदानासंदर्भात लोकांनी जागरूक व्हावं यासाठी अनेक स्तरांवरून विविध प्रकारे जनजागृती केली जाते. रांगोळी, गाण्याचा अल्बम किंवा पथनाट्य अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे कर्नाटकात एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्यात येणारे.

पुण्यात अवयदानासंदर्भात काम करणारी रिबर्थ या संस्थेने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आलीये. २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट असे तीन ही रॅली आयोजित कऱण्यात आलीये. या रॅलीमधून २०० किलोमीटरपेक्षा जास्तीचा रस्ता पार करण्यात येईल. या रँलीमध्ये डॉक्टर, रूग्ण आणि कर्नाटकातील सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत.

अवयवदानाची चळवळ ही देशभर व्हावी हे यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं उद्दीष्ट आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाची हा मोहीम राष्ट्रीय स्तरावर पोहोचावी असं रिबर्थ या संस्थेचं उद्दीष्ट आहे.

PHOTO-2018-07-12-16-57-11

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना रिबर्थ संस्थेचे संस्थापक राजेश शेट्टी म्हणाले की, “ज्यावेळी आम्ही पुणे शहरात अवयवदानाच्या जनजागृती संदर्भात काम करायला घेतलं त्यावेळी शहरातील लोकांना याबाबत जास्त माहिती नव्हती. मात्र ज्यावेळी डॉक्टर, सामाजिक संस्था आणि राज्य सरकारने याच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले त्यानंतर अवयवदात्यांची संख्या वाढली. त्या प्रयत्नांमुळे आता लोकं अवयदानासंदर्भात जागरूक झालेत. मँगलोर हे एवढं मोठं शहर असून याठिकाणच्या लोकांमध्ये अजून पुरेश्या प्रमाणात जनजागृती नाहीये. त्यामुळे अवयवदानाची संख्या ही याठिकाणी कमी आहे.”

शेट्टी पुढे म्हणाले की, “या रँलीसाठी आम्ही या शहरातील डॉक्टर आणि सामाजिक संस्थांशी बोललो आहोत. ते देखील यामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी कळवलंय. आम्हाला अजून बऱ्याच शहरांमध्ये जाऊन अवयदानासंदर्भात जनजागृती करायची आहे.”

या मोहिमेबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना पुण्याच्या विभागीय अवयवदान समितीच्या समन्वयक आरती गोखले म्हणतात, “पुण्यातील संस्थेने अवयदानासंदर्भातील जनजागृतीसाठी पुढाकार घेतलाय हे फार चांगलं आहे. देशातील अनेक लोकं यामुळे जागरूक होतील, त्यामुळे मोठ्या संख्येने अवयवदान होतील आणि अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल.”

ही सायकल रॅली अशी असेल,

  • पहिला दिवस- मँगलोर ते धर्मस्थळ (७५ किलोमीटर)
  • दुसरा दिवस- धर्मस्थळ ते कुक्के सुभ्रमण्य (५३ किलोमीटर)
  • तिसरा दिवस- कुक्के सुभ्रमण्य ते मँगलोर (१०५ किलोमीटर)
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter