रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची किडनी ट्युमरमुक्त

पिंपरी-चिंचवडमधील 55 वर्षांच्या व्यक्तीच्या किडनीच्या आत ट्युमर होता आणि किडनी वाचवून हा ट्युमर काढणं डॉक्टरांसाठी खूप आव्हानात्मक होतं. मात्र रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांना हे सहज शक्य झालं. रुबी हॉल क्लिनकच्या डॉक्टरांनी या व्यक्तीवर रोबोटिक शस्त्रक्रिया करत या व्यक्तीची किडनी वाचवली आणि किडनीतील ट्युमरही पूर्णपणे काढला.

0
223
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पिंपरी-चिंचवडमधील 55 वर्षांच्या व्यक्तीच्या पोटात वेदना होत होत्या. सुरुवातील या वेदना दूर होण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले मात्र काहीच परिणाम झाला नाही. अखेर हा व्यक्ती डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफीत या व्यक्तीच्या किडनीत एक गाठ असल्याचं दिसलं. हे समजल्यानंतर त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली

रुग्ण म्हणाला, “माझ्या किडनीत गाठ असल्याचं समजताच मला धक्काच बसला. मला कॅन्सर तर नाही ना, याची भीती वाटू लागली. याशिवाय मला किडनी गमवावी लागणार का असे अनेक विचार माझ्या मनात घर करू लागले.”

या रुग्णाला डॉक्टरांनी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तिथं तपासणी केला असता या व्यक्तीच्या किडनीच्या किडनीत असलेला ट्युमर जीवघेणा नव्हता मात्र तो काढणं खूप आव्हानत्मक होतं असं दिसून आलं.

रुबी हॉल क्लिनिकमधील रुपा राहूल बजाज सेंटर ऑफ एक्सेलन्स इन रोबोटिक सर्जरीचे संचालक डॉ. हिमेश गांधी म्हणाले, “रुग्णालयात या रुग्णाच्या तपासण्या केल्या असता त्याच्या किडनीत ट्युमर होता जो कोणत्या जीवघेण्या आजारासाठी कारणीभूत नव्हता. मात्र तो किडनीच्या आतल्या भागात होतो. किडनीच्या आत ट्युमर असण्याची अशी प्रकरणं दुर्मिळ म्हणजे 20 टक्केच असतात आणि खूप आव्हानत्मक असतात. किडनीच्या पृष्ठभागावर असलेल्या ट्युमरप्रमाणे किडनीच्या आत असलेल्या ट्युमरची जागा आपल्याला समजत नाही. शस्त्रक्रिया करून असा ट्युमर काढणं हे तांत्रिकदृष्ट्या खूप अडचणीचं असतं तसंच शस्त्रक्रियेदरम्यान अनेक गुंतागुतही निर्माण होतात”

किडनीत ट्युमर असल्यास 2 पर्याय असतात एक म्हणजे शस्त्रक्रियेनं ट्युमर काढणं किंवा किडनी काढून टाकणं. मात्र रुग्णाची किडनी चांगली होती त्यामुळे किडनी काढण्याचा पर्याय डॉक्टरांना योग्य वाटत नव्हता. तर शस्त्रक्रिया करून ट्युमर काढणंही आव्हानात्मक होतं कारण ट्युमर किडनीच्या आत होतो. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं.

डॉ. हिमेश गांधी म्हणाले, “किडनीच्या आतील हा ट्युमर शोधणं म्हणजे वाळलेल्या गवताच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं असतं. मात्र अल्ट्रासाऊंडमुळे ट्युमरचा आकार, जागा समजण्यास मदत होते. तसंच ट्युमरजवळील रक्तवाहिन्यादेखील समजून येतात. त्यामुळे आम्ही अल्ट्रासाऊंड प्रोबचा वापर करून ट्युमर काढला. या शस्त्रक्रियेला 2 तब्बल 2 तास लागले. ट्युमरचा आकार 4 सेमी होता. शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीत ट्युमर पूर्णपणे निघाला असल्यास दिसून आलं आणि आम्ही किडनी वाचवण्यातदेखील यशस्वी झालो”

रुबी हॉल क्लिनिकमधील रुपा राहूल बजाज सेंटर ऑफ एक्सेलन्स इन रोबोटिक सर्जरीमधील हेड ऑफ ऑपरेशन डॉ. मनीषा करमरकर म्हणाल्या, “असं आव्हानात्मक प्रकरण हाताळल्यानंतर रुग्ण लवकर बरा होत असल्याचं पाहून आम्हाला खूप आनंद झाला. शस्त्रक्रियेनंतर 3 दिवसातच रुग्णाला डिस्चार्ज दिला. रोबोटिक शस्त्रक्रियेसह आमच्या डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)