पुणे- केईएम रूग्णालयात पिडोफिलियावर उपचार

पुण्यातील केईएम रूग्णालयात एक नवीन टेस्ट विकसीत कऱण्यात आलीये. या तपासणीद्वारे एखाद्या व्यक्तीमध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण करण्याची मानसिक वृत्ती आहे का हे समजणार आहे शिवाय यावर उपचारही करण्यात येणारेत.

0
190
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पुण्यातील केईएम रूग्णालयाने पिडोफिलिया म्हणजे लहान मुलांचं होणारं लैंगिक शोषण याविषयीच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतलाय. या रूग्णालयाकडून याविषयी एक नवीन टेस्ट विकसीत कऱण्यात आलीये. या तपासणीद्वारे एखाद्या व्यक्तीमध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण करण्याची मानसिक वृत्ती आहे का हे समजणार आहे. आणि जर अशी व्यक्ती आढळल्यास त्यावर रूग्णालय़ाकडून उपचारही करण्यात येणारेत.

रूग्णालय प्रशासनाच्या सांगण्यानुसार, मानसिक विकारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आमचं ध्येय आहे. जर एखाद्या रूग्णामध्ये अशी वृत्ती असल्यास त्यावर करण्यात येणारे उपचार गोपनीय ठेवण्यात येतील.

याविषयी पुण्यातील केईएम रूग्णालयाच्या सायकॅट्री विभागाचे प्रमुख डॉ. वासुदेव परळीकर माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाले की, “आम्ही त्या व्यक्तींची तपासणी करू ज्यांना असं वाटतं की, त्यांच्यामध्ये पिडोफिलियाशी संबंधीत लक्षणं आहेत. यावर प्राथमिक प्रतिबंध करणं हे आमचं ध्येय आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तपासणी करून घ्यावी.”

या तपासणीबाबत माहिती देताना डॉ. परळीकर म्हणाले की, “या तपसाणीसाठी आम्ही जर्मनीवरून हे मॉडल आणलं असून त्यामध्ये भारतीय पद्धतीद्वारे बदल केलेत. या सर्व प्रकरणांंची नोंद घेऊन त्याला प्रतिबंध कऱणं हे आमचं उद्दीष्ट आहे. जेणेकरून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणं शून्यावर येतील.”

जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, लहान मुलं किंवा किशोरवीयन मुलांचं लैंगिक शोषण करण्याची वृत्ती ही मानसिक विकार असून त्याला पिडोफिलिया म्हणतात.

अशी रूग्णांवर सायकोथेरेपीद्वारे उपचार करण्यात येणारेत. या थेरेपीद्वारे त्या व्यक्तीमध्ये आढळणारी लैंगिक शोषणाची विविध परिमाणं तपासली जातील. रूग्णांच्या गरजांनुसार त्यावर वैद्यकीय आणि मानसिक उपचार देण्यात येतील.

याशिवाय व्यक्ती www.troubled-desire.com या संकेतस्थळाला भेट देऊन स्वतःवर उपाय करू शकते. यामाध्यामातून बर्लिन इंस्टिट्युट ऑफ सेक्सोलॉजी यांच्याकडून या मानसिक विकारावर गोपनीयरित्या उपचार पुरवण्यात येतात.

संशोधनाच्या माध्यमातून, जी व्यक्ती बालशोषण या मानसिक आजाराशी पीडित असते ती व्यक्ती कायम दबावाखाली असते. आपल्यावरील ताबा सुटेल का अशी भिती त्यांना सातत्याने वाटत राहते. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाच्या सांगण्यानुसार, या तपासणीद्वारे अशा लोकांची मानसिकता लक्षात घेण्यास मदत होणारे. यामुळे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये देखील घट होईल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter