मुंबईकरांनो उष्णता वाढतेय..अशी घ्या त्वचेची काळजी

दोन दिवसांपासून उष्णतेचा 'ताप' मुंबईकरांना सहन करावा लागतोय. तापमानात अचानक वाढ झालीये. घराबाहेर पडलं तर अंगाला उष्णतेचे चटके बसतायत. म्हणून त्वचा चांगली कशी ठेवायची याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी काही टीप्स तुमच्यासाठी दिल्यात.

0
72
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईकरांच्या अंगाची गेल्या काही दिवसांपासून लाहीलाही होतेय. सप्टेंबर महिन्यातंच मुंबईकर ऑक्टोबर हीट अनुभवतायत. प्रचंड उकाडा, त्यात घामाच्या धारा. घराबाहेर पडणं अशक्य झालंय. उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना यामुळे त्वचा आणि केसांसंबंधीच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.

त्वचारोगतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, उष्णता आणि आर्द्रतेचा त्रास हा घराबाहेर आणि ऑफीसला जाणाऱ्या व्यक्तींना सहन करावा लगातो.

उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

  • केसगळती
  • त्वचा कोरडी होणे
  • त्वचा काळवंडणे
  • त्वचा तेलकट होणे
  • त्वचेवर पुरळ उठणे
  • केसात कोंडा होणे

क्युटीस स्कीन स्टुडिओचे त्वचोरोगतज्ज्ञ आणि लेसर सर्जन डॉ. अप्रितीम गोयल सांगतात की, “उष्णता आणि आर्द्रतेमुळे अतिरिक्त घाम येतो. ज्या व्यक्ती जास्त काळ घराबाहेर असतात त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे ऊन खूप जास्त असल्याने लोकांनी शक्यतो लाइट रंगाचे कपडे घालावे.”

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोमा सरकार सांगतात की, “लोकांनी अशा दिवसांत त्वचेसंबंधीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. या दिवसांत योग्य ते क्लिनसर आणि फेस वॉश वापरा. दररोज माईल्ड शँपूने केस धुवा. तसंच केसांना ब्लो-ड्राय करणं टाळा. जास्त मेक-अप करणंही टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतायत.”

उष्णतेपासून बचावासाठी काही टीप्स

  • चेहऱ्यासाठी फेस वॉश आणि फेस स्प्रेचा वापर करा
  • बाहेर पडताना छत्री, स्कार्फ, टोपी सोबत ठेवा
  • भरपूर पाणी प्या आणि योग्य तो आहार घ्या
  • साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर करा
  • गडद रंगाचे कपडे घालू नका
  • चेहऱ्यासाठी केमिकल प्रोडक्टचा वापर करू नका
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)