मुंबईत हेपेटायटिसने गर्भवती महिलेचा मृत्यू

कुर्ला गार्डन व एल.बी.एस मार्गावरील २३ फेरीवाले व ५ अनधिकृत दुकानांवर कारवाई करून सात किलो मिठाई, ५८ किलो खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ, १८७ लिटर सरबत व ३२५ किलो बर्फ नष्ट करण्यात आला. याशिवाय हेपेटायटिसचा प्रसार होऊ नये, याकरता काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भातही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे

मुंबईत हेपेटायटिसने गर्भवती महिलेचा मृत्यू
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईत हेपेटायटिसच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच, जुलै महिन्यात या आजारामुळे कुर्ला परिसरातील २५ वर्षीय एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. तर, जुलै महिन्यात १३४ नवीन हेपेटायटिस रुग्णांची नोंद पालिकेच्या विविध रुग्णालयांत करण्यात आली आहे.

या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३५० घरांचे व १६८० लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं. कुर्ला गार्डन व एल.बी.एस मार्गावरील २३  फेरीवाले व ५ अनधिकृत दुकानांवर कारवाई करून सात किलो मिठाई, ५८ किलो खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ, १८७ लिटर सरबत व  ३२५ किलो बर्फ नष्ट करण्यात आला. याशिवाय हेपेटायटिसचा प्रसार होऊ नये, याकरता काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भातही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या वर्षीच्या सुरूवातीपासूनच स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात फक्त एकाच रुग्णांची नोंद झाली होती. तर २०१७च्या जुलै महिन्यात ४१३ रुग्णांची नोंद झाली असून सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter