गोवर-रुबेला लसीकरण: नातवंडाना लसीकरण देत आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक संदेश

लोकांच्या मनात गोवर आणि रूबेला लसीकरणाबाबत संभ्रम राहू नये यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी गुरुवारी आपल्या दोन नातवंडांना ही लस देऊन सकारात्मक संदेश दिलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी बालकांना लस देण्यात आली आहे. लोकांच्या मनात या लसीकरणाबाबत संभ्रम राहू नये यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी गुरुवारी आपल्या दोन नातवंडांना ही लस देऊन सकारात्मक संदेश दिलाय. विलेपार्लेच्या सीएनएमएस शाळेत आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण सत्रात आरोग्यमंत्री हजर राहिले आणि त्यांनी या शाळेत शिकत असलेल्या त्यांच्या नातवंडांना लसीकरण करुन घेतलं.

यासंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री दिपक सावंत म्हणाले, “राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात झालीये. सहा आठवड्यांच्या या लसीकरण मोहिमेत सध्या शाळांमध्ये लसीकरणाचं सत्र आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांना लस देण्यात येतेयं. दररोज राज्यभरात साधारणत: 10 लाख बालकांना लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आजपर्यंत सुमारे दीड कोटी बालकांना लसीकरण करण्यात आलं असून राज्याचे सुमारे 45 टक्के उद्दिष्ट साध्य झालंय.”

c49ca6cd-fbab-4582-b589-15ba2c011c58

या लसीकरण मोहिमेसंदर्भात काही ठिकाणी पालकांच्या मनात संभ्रम असून लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून पालकांनी लसीकरण न करण्याची भूमिका शाळांना कळवल्याच्या घटना घडल्यात. मात्र ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगतानाच आपल्या नातवंडांनाही ही लस देणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी या मोहिमेच्या पत्रकार परिषदेत सांगितले होतं. त्यानुसार गुरुवारी विलेपार्लेतील सीएनएमएस शाळेमध्ये मुंबई महापालिकेमार्फत लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलं होतं.

आरोग्यमंत्र्यांची नात रिया (वय वर्ष 7) ही या शाळेत इयत्ता पहिलीत शिकते आणि नातू रोहित (वय वर्ष 4) छोटा शिशू गटात शिकतो. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास या दोघा नातवंडांना आरोग्यमंत्री असलेल्या आजोबांच्या उपस्थितीत लस देण्यात आली. दोघा नातवंडांनी आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून लस टोचून घेतली.

पालकांनी गोवर-रुबेला लसीबाबत कुठलाही गैरसमज न करता आपल्या मुलांना लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter