#PoshanMaah2019 – फक्त फळं खाल तर वाचा काय होईल

अनेक जण इतर अन्नपदार्थ सोडून आहारात फक्त फळांचा समावेश करतात. मात्र आरोग्यासाठी चांगली असलेली ही फळं इतर काही न खाता खाल्ली तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आरोग्यासाठी फळं खूप चांगली असतात. फळांमध्ये अँटिऑक्सिटंड, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स असतात. त्यामुळे आहारात नियमित फळांचा समावेश करावा. मात्र सर्व घटकांचा स्रोत म्हणून तुम्ही इतर अन्नपदार्थ सोडून फक्त फळच खाताय? फक्त फळं खाल्ल्यानंही तुम्ही निरोगी राहाल असं तुम्हाला वाटतंय? तर तो तुमचा गैरसमज आहे. तुम्ही फक्त फळांवरच जगताय, तर तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात पाहुयात.

सांधेदुखी

कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात. दूध, चीझ, दही, काही पालेभाज्या या कॅल्शिअमचं स्रोत आहेत. मात्र हे सर्व टाळून तुम्ही फक्त पालेभाज्या खाताय तर तुम्हाला पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम मिळणार नाही.

कुपोषण

शरीराची ठेवण नीट राहण्यासाठी पोषक घटक खूप गरजेचं असतात. फळांमध्ये सर्वच पोषक घट नसतात. त्यामुळे फक्त फळं खाल्ल्यानं तुमच्या शरीराला योग्य आवश्यक पोषक घटक मिलथ नाहीत.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

फळांमध्ये व्हिटॅमिनट सी असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र तरीही तुम्ही फक्त फळंच खात असाल तर हीच रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याचीही शक्यता असते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी पोषक घटक आवश्यक असतात. आणि काही पोषक घटक शोषण्यासाठी शरीराला थोड्याफार प्रमाणात फॅटची गरज असते. मात्र फळांमधून फॅट मिळत नाही.

अशक्तपणा

फळं ही कॅलरीजचा उत्तम स्रोत आहेत. मात्र तरी तुम्ही आहारात फक्त फळांचा समावेश केला असेल, तर शारीरिक कार्य करताना तुम्हाला अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. कारण स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं प्रोटिन फळांमधून मिळत नाहीत. दररोजच्या आहारात प्रोटिनचा समावेश नसेल, तर स्नायू आखडण्याची शक्यता असते.

लठ्ठपणा

फळांमध्ये बॅट फॅट नसलं तरी फक्त फळं खाल्ल्यानं वजन वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. कारण काही फळांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. जसं आपण आधी पाहिलं की फळांमुळे अशक्तपणा येतो, त्यामुळे शारीरिक कार्ये करण्यात अडथळा येतो. त्यामुळे आपण शारीरिक कार्ये करत नाहीत आणि परिणामी शरीरात कॅलरीज साठतात आणि शरीरातील फॅट वाढतं.

ओटीपोटात दुखणे

मलावरोध होऊ नये, यासाठी शरीराला फायबर गरजेचं आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की फक्त फळं खा आणि शरीराला फायबर पुरवा. अति प्रमाणात फायबरयुक्त आहार केल्यानं पचनक्रियेवर परिणाम होतो. ओटीपोटात दुखणं हे त्याचंच एक लक्षण आहे. तज्ज्ञांच्या मते अति प्रमाणात फायबरचं सेवन मलावरोधाला कारणीभूत ठरू शकतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter