#PoshanMaah2019 – मुलं जेवतात, पण त्यांचं पोषण होतंय?

मुलांचं पोषण नीट व्हावं यासाठी आहारतज्ज्ञ ‘रेकमंडेड डाएटरी अलोअन्स’ (आरडीए) या पद्धतीवर भर देतात. सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून राबवला जातो. त्यानिमित्तानं आरडीए म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या मुलांची प्रतिकारकशक्ती चांगली असावी असं प्रत्येक आईला वाटतं. त्यासाठी मुलांच्या आहारात विविध पदार्थांचा समावेशही केला जातो. बरेचदा मुलांच्या खाण्याच्या नखऱ्यांमुळे सगळे पदार्थ त्यांच्या पोटात जात नाहीत आणि गेले तरीही त्यातून सगळे व्हिटॅमिन्स त्यांना मिळतीलच याची खात्री नसते. त्यासाठी आहारतज्ज्ञ ‘रेकमंडेड डाएटरी अलोअन्स’ (आरडीए) या पद्धतीवर भर देतात.

काय आहे रेकमंडेड डाएटरी अलोअन्स’?

फूड अॅन्ड न्यूट्रीशन बोर्ड ऑफ द नॅशनल रिसर्च काउंसिल आणि नॅशनल एकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांनी आहारासंदर्भातले काही निकष ठरवले आहेत. यात दररोज आहारात किती कॅलरीज आणि व्हिटॅमिन्स असावेत याचं प्रमाण ठरवून दिलं आहे. चांगलं आरोग्य टिकवण्यासाठी आरडीए अनुसार आहार घेणं गरजेचं असतं.

यासंदर्भात बोलताना आहारतज्ज्ञ डॉ. नीती देसाई म्हणाल्या की, “४-१२ या वयोगटातल्या मुलांना संपूर्ण पोषण मिळणं गरजेचं असतं. त्यांना आरडीएमधील सगळे पौष्टीकद्रव्य त्यांना गरजेचं असतं. त्यांची वयाप्रमाणे उंची आणि वजन वाढण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे परिपूर्ण आहारसोबतच पौष्टिकद्रव्यांचा डोज घेणंही गरजेचं असतं.”

मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी ए, सी, ई हे व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. त्याचसोबत झिंक, लोह या खनिजांचीही शरीराला गरज असते.

दिवसभर मुलं सतत खूप शारीरिक हालचाली करत असतात. त्यामुळे त्यांच्या पोषणाची काळजी घेणं गरजेचं असतं असं डॉ. स्वाती भावे, बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रीशियन्सच्या माजी अध्यक्ष यांनी सांगितलं. “मुलांना योग्य पोषण जर मिळालं नाही तर त्यांच्यामध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. हाडांची वाढ, हार्मोन्स, दातांचं आरोग्य, रोगप्रतिकारकशक्ती या गोष्टींवर परिणाम होऊ शकतं,” असं डॉ. स्वाती भावेंनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या की, “हल्ली मुलांच्या आहारात जंक फूडच प्रमाण जास्त असतं. यामध्ये फॅट, साखर आणि मीठाचं प्रमाण जास्त असतं. जर मुलं व्यवस्थित जेवत नसतील तर त्यांना व्हिटॅमिन्सचा डोज देणं गरजेचं ठरतं.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter