सव्वा कोटी बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट, आरोग्यमंत्री

पोलिओ निर्मुलनासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतलीये. २८ जानेवारी आणि ११ मार्चला राज्य भरात पोलिओ डोस बाळांना पाजण्यासाठी ही मोहीम आहे. या मोहीमेत दोन कोटी नव्वद लाख घरांमध्ये जाऊन बाळांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकारची मोहीम
  • २८ जानेवारी ११ मार्चला राबवणार मोहीम
  • राज्यभरात ८५ हजार बुथची उभारणी

पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी २८ जानेवारी आणि ११ मार्चला पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम राज्य सरकारने हाती घेतलीये. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील १ कोटी २१ लाख २९ हजार बालकांना पोलिओ डोस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात ८५ हजार बुथ उभारण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलीये. आरोग्यमंत्र्यांनी लोकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलंय.

दरम्यान, बुधवारी राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. लसीकरण मोहिमेसाठी नियोजन आणि संबंधित विभागांनी करायच्या कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाचे प्रभारी सचिव संजय देशमुख यांनी आढावा घेतला.

१९९५पासून पोलिओ निर्मुलन विशेष मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यात दोन वेळा विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविली जाते. पोलिओचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यंदा २८ जानेवारीला ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस सुमारे २ कोटी ९० लाख घरांना भेटी देऊन बालकांना डोस पाजण्यात येणार आहे.

२०१७मध्ये विशेष मोहिमेत १०२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत एक कोटी २३ लाख ५१ हजार बालकांना डोस पाजण्यात आला.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter