पंतप्रधान कार्यालयाने घेतली डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूची दखल

डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीलंय. इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूनंतर मॅनहोल उघडं ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं.

0
250
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईतील प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरांचा मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतलीये. पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. ६ सप्टेंबरला पाठवलेल्या पत्रात पंतप्रधान कार्यालयाने, राज्याच्या मुख्य सचिवांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना त्यांनी केलेल्या तक्रारीबाबत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

Letter-Insert

पंतप्रधान कार्यालयाने पाठवलेल्या पत्रात म्हटलंय

  • ड़ॉ. सुधीर पाटील यांनी ३१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं होतं. यात त्यांनी कारवाईची मागणी केली होती. तक्रारकर्त्यांच्या पत्राला उत्तर देण्यात यावं आणि याची प्रत वेबसाईटवर अपलोड करण्यात यावी.

पंतप्रधान कार्यालयाने डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूची दखल घेतल्याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ. सुधीर पाटील म्हणतात, “ही एक चांगली गोष्ट आहे की, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली. मुंबईकरांसाठीचा हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढत राहू.”

डॉ. अमरापूरकरांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांची देशव्यापी संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला होता.

“आम्ही डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेकांना पत्र लिहीलं होतं. सर्वात पहिलं उत्तर पंतप्रधानांचं आलंय,” अशी माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली.

याबाबत डॉ. अमरापूरकर यांच्यासोबत काम करणारे डॉ. गौतम भन्साळी, म्हणतात, “पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली याचा मला आनंद आहे. डॉ. अमरापूरकरांप्रमाणे मृत्यू होणं हे खूप दुर्दैवी आहे. आता सरकार दोषींवर कारवाई करेल अशी आम्हाला आशा आहे.”

२९ ऑगस्टला मुंबईत अतिवृष्टी झाली. मुंबापूरी ठप्प झाली. रस्त्यांवर पाणी साचलेल्या लोकं चालत घरचा रस्ता गाठत होते. डॉ. अमरापूरकरही आपली गाडी सोडून पायी घरी जाण्यास निघाले. पण, एलफिस्टन भागात उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. तब्बल ३६ तासांनी त्यांचा मृतदेह वरळी भागात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला. या घटनेनंतर डॉक्टरांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

पालिकेने या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती देखील स्थापन केलीये. ही समिती आपला अहवाल या आठवड्यात देण्याची शक्यता आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter