मुंबई- पालिकेच्या सर्व रुग्णालयांत आता मुलांसाठी ‘प्ले रूम’!

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर व शीव रुग्णालयांसह सर्व उपनगरीय रुग्णालयांतील बालरोग विभागात लवकरच लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र खोली (प्ले रूम) तयार करण्यात येणारे. पालिका रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, याबाबत प्रस्ताव पालिकेकडे मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने सकारात्मक मंजुरी दिलीये. त्यामुळे आता लवकरच सर्व पालिका व उपनगरीय रुग्णालयांत मुलांसाठी प्ले रूम सुरू होईल.

0
144
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रूग्णालय म्हटलं की आजारी रूग्ण, चिंतेत असलेले नातेवाईक आणि औषधं इतकंच चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र आता पालिकेच्या रूग्णालयांमध्ये तुम्हाला हे चित्र थोडं वेगळं दिसणार आहे. रूग्णालयात उपचारांसाठी आलेल्या लहान मुलांनी उत्साही आणि आनंदी राहावं यासाठी पालिका आणि उपनगरीय रुग्णालयांतील बालरुग्ण विभागात मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र खोलीची म्हणजेच प्ले रूम सुरु करण्यात येणारे.

यासंदर्भात प्रस्ताव देत नगरसेविका सईदा खान यांनी पालिकेकडे ठरावाची सूचना मांडली होती. या प्रस्तावाला आरोग्य समितीने सकारात्मकता दर्शवली आहे. पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता लवकरच पालिका रुग्णालयांत मुलांसाठी प्ले रूम सुरू होईल.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना नगरसेविका सईदा खान यांनी सांगितलं की, ‘‘आजारपणामुळे लहान मुलं चिडचिड करतात. मात्र आजारपणातही मुलांना आनंद मिळावा, यासाठी कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात मुलांसाठी प्ले रूम सुरू केलीये. याला मिळणारा प्रतिसाद पाहता सर्व पालिका आणि उपनगरीय रुग्णालयांतील बालरुग्ण विभागात मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र खोली असावी, याबाबत पालिकेकडे ठरावाची सूचना मांडली होती. ही सूचनेला आता पालिका प्रशासनानं सकारात्मकता दर्शविली आहे.’’

डॉ. खान पुढे म्हणाल्या की, ‘‘पालिकेच्या या निर्णयानंतर आता लवकरच हे प्ले रूम सुरू करण्यात येईल. यासाठी रुग्णालयातील जागेच्या उपलब्धतेनुसार अशी खोली तयार करून लहान मुलांना विरंगुळा करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. पालिकेच्या 16 उपनगरीय रुग्णालयांपैकी 15 रुग्णालयांत बालरुग्ण विभाग आहे. त्या विभागाच्या भिंती विविध रंगांनी, चित्रांनी रंगवल्या जातील. याशिवाय कॅरम, चेंडू, गाड्या, सायकल इत्यादी खेळणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’’

‘‘आजारपणामुळे सतत औषधं आणि तपासण्या यामुळे मुलं वैतागून जातं. यातून मुलांना विरंगुळा मिळावा, यासाठी अनुषंगानं रुग्णालयांत मुलांना खेळण्यासाठी प्ले रूम सुरू करणं या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे’’, असंही डॉ. खान यांनी सांगितलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter