‘कबूतरांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम’

फुफ्फुसांच्या आजारांसंबधी पुण्यामध्ये एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यामध्ये छातीच्या आजारांच्या तज्ज्ञांनी एक अभ्यास प्रदर्शित केला

0
44
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कबुतर जा जा… हे गाणं फार प्रसिद्ध झाल होत. यामध्ये ती नायिका निरोप घेऊन जाण्यासाठी कबुतराला जा म्हणतेय. मात्र, कबुतरांच्या जास्त सहवासाने आपल्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे काबूतरला जा जा म्हणावं लागेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

फुफ्फुसांच्या आजारांसंबधी पुण्यामध्ये एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यामध्ये छातीच्या आजारांच्या तज्ज्ञांनी एक अभ्यास प्रदर्शित केला.

कबूतरांमुळे छातीचे आजार कसे पसरतात यावर हा अभ्यास करण्यात आलाय.

शहरात जवळपास १५ टक्के फुफ्फुसांच्या आजारांच्या प्रकरणाची नोंद झाली असल्याची माहिती आहे. यामध्ये ५० टक्के प्रकरणं ही कबूतरांच्या संसर्गामुळे झाल्याचं समजतयं.

या अभ्यासानुसार, कबूतरांच्या पिसं गळतात व पडतात. याचा लोकांच्या फुफ्फुसावर विपरीत परिणाम होतो. जर या संसर्गाचं उशीरा निदान झालं तर, मृत्यू देखील ओढावण्याची शक्यता असते.

याविषयी छातीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. महावीर मोदी सांगतात की, “एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग झालाय याची तपासणी करण्यासाठी योग्य त्या तपासण्या काही शहरांमध्ये उपलब्ध नाहीयेत. शिवाय काही डॉक्टरांना देखील याबद्दलची माहिती नाहीये. यावर विशिष्ट अशी उपचारपद्धती नाहीये.”

डॉ. मोदी पुढे म्हणाले की, “कबूतरामुळे फुफ्फुसासंबंधीचे आजार कसे होतात याविषयी लोकं जास्त ज्ञात नाहीये. यामुळे लोकं ब्राँकायटिस, अस्थमा, क्षयरोग यांवर उपचार घेतात. मात्र मुख्य कारण हे कबूतरांमुळे होणारा संसर्ग असतो”

सतिश मोरे(नाव बदललेलं) हे गेल्या वीस वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागात कामाला आहेत. सतिश हे छातीत दुखण्याची तक्रार घेऊन डॉ. मोदींकडे आले. त्यांच्या सगळ्या चाचण्या केल्या मात्र कोणत्याही आजाराचं निदान झालं नाही.

डॉक्टरांकडून जेव्हा त्यांची सखोल तपासणी करण्यात आली तेव्हा मोरे यांना बर्ड फॅन्सीयर लंग या आजाराचं निदान करण्यात आलं. या आजार पक्षांच्या पिसांच्या संसर्गामुळे पसरतो. मोरेंच्या ऑफीसजवळ बऱ्याच प्रमाणात कबूतरं आहे. म्हणून गेल्या २० वर्षात त्यांना हा संसर्ग झाला. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना कबूतरांच्या संपर्कापासून दूर राहण्यास सांगितलंय.

डॉ. मोदी यांनी आणखी एक प्रकरण सांगितलं. एका घरातील तीन महिलांना हा बर्ड फॅन्सीयर लंग आजार झाला. त्यांना देखील कबूतरांमुळे संसर्ग झाला होता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter