मेसेज पाठवून टाटा रूग्णालयाने केली तोंडाच्या कॅन्सरची जनजागृती

स्मार्टफोन्सच्या जमान्यात आपलं काम फक्त एका क्लिकवर होतं. फोन आपण आपल्यापासून दूर ठेऊ शकत नाही. टाटा मेमोरिअल रूग्णालयाने साउथ एशियन जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये एक संशोधन छापलंय. ज्यात तोंडाचा कर्करोग आणि तोंडाची स्वच्छता ठेवण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी मेसेजचा चांगल्या पद्धतीने वापर होत असल्याची माहिती देण्यात आलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तंबाखूच्या सेवनामुळे होणारा तोंडाचा कर्करोग भारतामध्ये सर्वात जास्त लोकांना होतो. दरवर्षी भारतात १ लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. पण, सर्वात धक्कादायक म्हणजे, नवीन प्रकऱणातील ५० टक्के रुग्ण कॅन्सरचं निदान झाल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्यू पावतात.

तोंडाचा कर्करोग होण्यामागचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे तोंडाची अस्वच्छता. सिगारेट ओढणारे आणि तंबाखूचं सेवन करणारे सहसा गरीब रुग्ण असतात. त्यामुळे टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेसेजचा वापर केला.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. चतुर्वेदी म्हणतात, “आम्हाला लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एका परवडणाऱ्या प्रणालीचा वापर करायचा होता. ज्यामुळे रुग्णांचा वेळ वाचेल आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास होणार नाही. यानंतर आम्ही रुग्णांना पाठवलेल्या मेसेजचा फायदा झाला का नाही, रुग्ण तपासणीसाठी आले का नाही याची माहिती घेतली.”

संशोधनातून समोर आलेले मुद्दे,

  • २०६ रुग्णांचा संशोधनात सहभाग
  • ७३.६ टक्के सकारात्मक फरक
  • ६२.९ टक्के रुग्ण मेसेज मिळाल्यानंतर तपासणीसाठी आले
  • रुग्णांनी स्वत:च्या तोंडाची तपासणी करून घ्यावी यासाठी त्यांना आठवण देण्यासाठी हा मेसेज पाठवण्यात आला होता
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter