उष्णतेने मुंबईकरांना झाला गॅस्ट्रो!

मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा झालेल्या अचानक बदलाने आजारांना निमंत्रण मिळालंय. शहरातील दवाखान्यात सध्या गॅस्ट्रोच्या रूग्णांची रांग लागलीये. गॅस्टो हा आतड्यांचा संसर्ग असून यामध्ये डायरिया, पोटदुखी, मळमळ आणि उल्टी तर काहीवेळा ताप या समस्या उद्भवतात.

0
182
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईत थंडी गेली आणि अचानक पुन्हा गरम होण्यास सुरुवात झालीये. त्यामुळे दुपारच्या वेळी पुन्हा एकदा मुंबईकारांचा घामटा निघतोय. मात्र यासोबत डायरिया, पोटदुखी, मळमळ आणि उल्टी या समस्याही नागरिकांना जाणवतायत. तर शहरातील दवाखान्यांमध्ये गॅस्ट्रोच्या रूग्णांची रांग लागलेली पहायला मिळतेय.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गॅस्टो या संसर्गजन्य आजारांसह रोटा व्हायरसचेही रूग्ण आढळून येतायत. त्यामुळे यावर मात्र करण्यासाठी तज्ज्ञांनी काही टीप्स दिल्यात.

याविषयी जसलोक रूग्णालयाचे जनरल फिजीशियन डॉ. प्रतित समदानी यांच्या सांगण्यासानुसार, “गेल्या तीन आठवड्यांपासून माझ्याकडे येणाऱ्या गॅस्ट्रोच्या रूग्णांमध्ये वाढ झालीये. शिवाय रोटा व्हायरचेही रूग्णही पाहायला मिळतायत. या रूग्णांमध्ये ३० ते ४५ वयोगटातील रूग्णांचा समावेश आहे. ३० ते ४० टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ झालीये. डायरियाच्या समस्येसोबत अनेकांना पाणी कमी प्यायल्यामुळे किडनीचे विकारही सतावतायत. या आजारांमधून बरं होण्यासाठी रूग्णांना जवळपास ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो.”

डॉ. मसदानी यांनी गॅस्ट्रोची लक्षणं सांगितली,

  • डायरिया
  • पोटदुखी
  • ताप
  • मळमळ आणि उल्ट्या

डॉ. समदानी पुढे म्हणाले की, “हवामानात झालेला बदल या परिस्थितीला कारणीभूत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी उकळून प्यावं. शिवाय शिळं अन्न खाणं टाळावं आणि स्वच्छता पाळावी.”

बॉम्बे रूग्णालयाचे कंसल्टंट फिजीशियन डॉ. गौतम भंसाली म्हणाले की, “गॅस्ट्रोच्या रूग्णांमध्ये वाढ झालीये. या आजाराचे दररोज ४ ते ५ रूग्ण माझ्याकडे येतात. वातावरणात झालेल्या बदलामुळे ही समस्या उद्भवलीये. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरील खाणं आणि दूषित पाणी पिणं टाळावं.”

वच्छन आरोग्य आणि डायबिटीस केअर ३६५च्या आहारतज्ज्ञ डॉ. अंकिता घाग यांच्यानुसार,

  • डायरियाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी केळे, भात, सफरचंद हे पदार्थ खावेत
  • भरपूर पाणी प्यावं, लिंबू सरबत किंवा नारळपाणी प्या
  • थोड्याथोड्या वेळाने काहीतरी खात जा
  • अन्न चावून चावून खा. जेणेकरून पचनादरम्यान त्रास होणार नाही
  • तेलकट, मसालेदार, दुग्धजन्य पदार्थ, कच्च्या भाज्या, मद्यपान, गोड पदार्थ, अति गरम आणि थंड पदार्थ खाणं टाळावं
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)