#PCOSAwarenessMonth- PCOSने ग्रस्त महिलांसाठी डाएट टीप्स

सप्टेंबर हा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. शरीरात हार्मोन्सचं असंतुलन झालं की पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास जाणवतो. त्यामुळे अशा दिवसांत कोणते पदार्थ खावेत आणि टाळावेत याची माहिती जाणून घ्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सप्टेंबर हा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. शरीरात हार्मोन्सचं असंतुलन झालं की पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास जाणवतो. अनियमित मासिक पाळी येणं किंवा शरीरात अॅन्ड्रोजन हार्मोन्स जास्त असणं हे या समस्येची कारणं ठरू शकतात. ही समस्या उद्भवली की अंडाशय योग्यरित्या कार्य करू शकत नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा त्रास नेमका कशामुळे होतो याचं कारण अजून अस्पष्ट आहे.

जर योग्य आहार आणि वजन नियंत्रणात ठेवलंं तर हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या टाळण्यासाठी कोणते पदार्थ आहारात असावेत किंवा नसावेत हे जाणून घ्या.

सार्डीन (मासा) 

हा माशाच्या सेवनाने ओमेगा 3 फॅटी अॅसिड मिळतं. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी नियंत्रणात राहते आणि मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते.

सफरचंद

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असणाऱ्या महिलांना हृदयाचे आजार होण्याचा धोका असतो. सफरचंदाच्या सेवनाने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयाचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

ग्लुटेन 

अनेकजण ग्लुटेन-फ्री डाएट घ्यायचा विचार करतात. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम सिंड्रोमचा त्रास असणाऱ्या महिलांनी देखील ग्लुटेन टाळलं पाहिजे. ग्लुटेनचं सेवन टाळलं की पोटफुगी किंवा अपचन याचा त्रास होणार नाही.

दुग्धजन्य पदार्थ

या प्रकारच्या पदार्थांनी देखील पोटफुगीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पदार्थ खाणं शक्यतो टाळावं. त्यामुळे पोटफुगीचा त्रास उद्भवणार नाही

सोयाबीन

संशोधनाच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की, सोयाबीनच्या सेवनाने थायरॉईच्या कार्यावर परिणाम होतो. सोयाबीनमुळे शरीरात असणाऱ्या ओस्ट्रोजेन हार्मोनवर परिणाम होतो. आणि यामुळे मासिक पाळीचं चक्र बिघडतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter