‘समाज काय म्हणेल, या भीतीने मानसोपचारांकडे दुर्लक्षच’

इंडियन जनरल ऑफ सायक्रॉटिस्ट या जर्नलमध्ये नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार मानसिक आजार असूनही लोक ते लपवण्याकडे अधिक भर देत आहेत हा निष्कर्ष पुढे आला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

देशात मानसिक आरोग्याशी संबंधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य २०१६ च्या सर्व्हेक्षणानुसार देशातील एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के लोकं मानसिक रोगी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर इंडियन जनरल ऑफ सायक्रॉटिस्ट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल एक संशोधन महत्त्वाचं ठरतं. मानसिक आजार असूनही रुग्ण डॉक्टरांकडे जात नसल्याचे यात म्हटले आहे.

मुंबईसह चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि लखनऊ या पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मानसोपचार तज्ज्ञांचीही कमतरता जाणवत आहे, असंही म्हटलं आहे. त्यामुळे, विशेषतः मध्यम उत्पन्नगटात मानसिक ताणतणाव वाढत असल्याने यावर आळा घालणे खऱ्या अर्थाने आव्हानात्मक काम आहे.

इतकंच नव्हेतर बहुतांश रुग्ण मानसोपचार तज्ज्ञांकडे मदत मागण्यास धास्तावतात. महत्त्वाचं म्हणजे, मानसिक आजार व उपचार यासंदर्भातील जागरूकतोचा अभाव याला कारणीभूत असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना फोर्टिस रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पारूल टंक म्हणाल्या की, “मानसिक रोगींची संख्या समाजात वाढत असताना या रुग्णावर उपचार करणे खरोखर आव्हान आहे. कारण लोकांचा मानसिक आजाराकडे बघण्याचा दुष्टीकोन अद्याप बदललेला नाही. मानसिक रोग असलेल्या व्यक्तीकडे समाज वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे लोक स्वतःहून आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे येत नाहीत. यात परिस्थितीत बदल घडून आला पाहिजे.”

“पहिल्यांदा रुग्ण उपचारांसाठी येतो. त्यावेळी खूप गांगरलेला असतो. मदत कशी मागायची हेच त्यांना कळतं नाही. परंतु, या तुलनेत सध्याची तरुण पिढी खूपच संवेदनशील असून डॉक्टरांशी ही मुलं मोकळ्यापणाने बोलतात”, असेही डॉ. टंक म्हणाल्या.

हिंदुजा रुग्णालय व मेडिकल रिसर्च केंद्रातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कर्सी चावडा म्हणाले की, “मानसिक आजारासंबंधी लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात अंधश्रद्धा आहे. त्यामुळे देवधर्म केल्यानंतर रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे येतो. अशावेळी रुग्णांवर उपचार करणं डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असतं. त्यामुळे मानसिक आजारासंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter