इथे सुरू केलाय रुग्णांनी ‘सत्याग्रह’

ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचं बळकटीकरणं, शासकीय रूग्णालयांत दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी रूग्णांनी नागपूरमध्ये सत्याग्रह सुरु केलाय. या सत्याग्रहात १५ रूग्णांचा समावेश असून हे रूग्ण जन आरोग्य अभियानासोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडणार आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • महाराष्ट्रात रुग्णांनी सुरू केला ‘सत्याग्रह’
  • चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि सरकारी आरोग्य सेवेचं बळकटीकरण या मागण्यांसाठी रुग्णांचं सरकारविरोधात आंदोलन
  • यवतमाळ, चंद्रपूर, पुणे, मुंबईतील १५ रुग्णांचा समावेश

सत्याग्रह म्हंटलं की आपल्याला आठवतात राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात मैदानात उतरलेले हुतात्मा भगतसिंह आणि त्यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्य सैनिक. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी पुकारल्या आंदोलनाने जनता पेटून उठली. व्यवस्थेविरोधात, मागण्या मान्य करण्यासाठी वेळोवेळी सत्याग्रहाचं हत्यार उपसलं जातं. असाच एक सत्याग्रह सध्या नागपूरात सुरू आहे.

पण, कधी ऐकलंय की रुग्णांनी सत्याग्रह सुरू केलाय. नाही ना..बहुदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही वेळ आलीये. जेव्हा रुग्णांनी आपल्या हक्कांसाठी सत्याग्रह सुरू केलाय.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा चांगली नाही. ग्रामीण जनतेपर्यंत सरकारी आरोग्य सुविधा पोहचू शकत नाही. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचं बळकटीकरणं, शासकीय रूग्णालयांत दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी रूग्णांनी नागपूरमध्ये सत्याग्रह सुरु केलाय.

या सत्याग्रहामध्ये यवतमाळ, पुणे, चंद्रपूर आणि मुंबईतील १५ रूग्णांचा समावेश आहे. हे रूग्ण जन आरोग्य अभियानासोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडणार आहे. यासोबतच सरकारी आरोग्य सेवेसंदर्भात त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलंय त्या घटनाही सांगणार आहेत.

PHOTO-2018-07-12-15-49-08 (1)

जीवरक्षक औषधांचा तुटवडा, औषधं वितरण व्यवस्थेतील त्रुटी, मानसिक आजारांवरील उपचारांचा अभाव, आरोग्य सेवेसाठी कमी तरतूद, सरकारी रूग्णालयता योग्य त्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत त्यामुळे लोकं खाजगी रूग्णालयांचा पर्याय निवडतात हे सर्व मुद्दे या रूग्णाकडून मांडण्यात येणारेत.

याविषयी माय मेडिकलल मंत्राशी बोलताना जन आरोग्य अभियानाचे सदस्य डॉ. सतीश गोगुलवार म्हणाले की, “राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांची परिस्थिती फारशी चांगली नाहीये. त्यामुळे गरीब रूग्णांना नाईलाजाने खाजगी आरोग्य व्यवस्थेची वाट धरतात. त्या ठिकणचा खर्च हा गरीब रूग्णांना परवडण्यासारखा नसतो. ग्रामीण भागातील लोकांचा आरोग्यावरलली खर्च वाढल्याने त्यांच्यावर कर्ज होतं.”

सत्याग्रहमध्ये सहभागी झालेले विनोद शेंडे म्हणाले की, “खासगी रुग्णालयांवर सरकारी नियंत्रणात अनेक त्रुटी आहेत. रुग्णांच्या हक्कांसाठी सरकारने खासगी वैद्यकीय क्षेत्राला नियंत्रित करावं अशी आमची मागणी आहे. रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या किमतीत पारदर्शकता असणं गरजेचं आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter