दातांचा उपचार वेदनारहित करणारी पद्धत – हिप्नोडाँटिस्ट

0
1646
डेंटिस्टची भिती घालवणारा हिप्नोडाँटिस्ट
सोर्स- गूगल
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मेडिटेशन करण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मेडिटेशन मधलाच एक प्रक्रार म्हणजे संमोहन (हिप्नोटिजम). याविषयी अनेक गैरसमज आजही लोकांच्या मनात आहेत. संमोहन म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्रिया.

डेंटिस्टची भिती घालवणारा हिप्नोडाँटिस्ट
डॉ. प्राची एस.एस, डेंटिस्ट

संमोहनाचा वापर करुन दातांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येऊ शकतात. दातांचा त्रास होत असेल तरीही, त्यावर उपचार करुन घेण्यासाठी लोकांच्या मनात भिती असते. डेंटिस्टकडे आल्यावर त्यांच्यामध्ये थोडा नर्व्हसनेस असतोच. ड़ॉक्टरांच्या हातातील वैद्यकीय साधनं बघून रुग्ण आधीच घाबरलेला असतो. यामुळे डॉक्टरांनी कितीही रिलॅक्स करण्याचे प्रयत्न केले तरीही, रुग्णांच्या मनात भिती घर करुनच असते. ही भिती घालवण्यासाठी संमोहनाचा वापर केला जाऊ शकतो. याला हिप्नोडाँटिस्ट असं म्हटलं जातं.

संमोहन अवस्थेमध्ये डॉक्टरांनी सांगितलेल्या सुचनांचं योग्य प्रकारे पालन होऊ शकतं. यामुळे उपचार करणं डॉक्टरांसाठीही सोपं होतं. अशाप्रकारे संमोहनशास्त्राचा, दंतशास्त्रात मोठा उपयोग होऊ शकतो.

लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असलेला कुठलाही व्यक्ती संमोहित होऊ शकतो. संमोहन ही कूठली जादू नसुन एक शास्त्र आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर केल्यास, कुठलाही धोका संभवत नाही.

हिप्नोडाँटिस्टचे फायदे

  • ताण नाहिसा होतो
  • दातांच्या उपचारांसदर्भातला फोबिया नाहिसा होतो
  • वेदनांवर नियंत्रण
  • रक्तस्त्रावावर नियंत्रण

पाश्चात्य देशांमध्ये हिप्नोडाँटिस्टचा वापर केला जातो. मात्र भारतात ही पद्धत तुलनेनं नवी आहे. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खालच्या लिंक्स उपयुक्त ठरतील.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter