या 10 टीप्स ठेवतील तुमच्या मुलांचे दात निरोगी!

तोंडाचं आरोग्य कसं राखावं याबाबत लहान वयातच मुलांना शिकवल्यास भविष्यात त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. लहान मुलांचे दंत चिकित्सक डॉ. सुमेध खरे यांनी याबाबत अधिक मार्गदर्शन केलं आहे.

0
967
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तोंडाचं आरोग्य कसं राखावं याबाबत लहान वयातच मुलांना शिकवल्यास भविष्यात त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. याची सुरुवात तुम्ही तुमच्यापासूनच करा. तुम्ही तोंडाची स्वच्छता राखल्यास मुलांनाही त्याचं महत्त्व पटेल. मुलांसोबत दात घासणे किंवा त्यांच्या आवडीचा टूथब्रश देणे यामुळे मुलांना तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.

मुलांचं मौखिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबाबत काही टीप्स

  1. मुलाच्या पहिल्या वाढदिवशी त्याच्या दातांची तपासणी जरूर करून घ्या
  2. लहान मुलांचे दंत चिकित्सिक मुलांचं वेगळं वर्तन आणि मानसशास्त्र समजतात.
  3. बाळाला काही भरवल्यानंतर त्याच्या हिरड्या स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे.
  4. मुलांचे दात किडू नयेत, यासाठी पालकांचे दातही निरोगी असायला हवेत
  5. वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत टूथपेस्टची गरज नाही. ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी कमी फ्लूरॉईड असलेली टूथपेस्ट वापरू शकता. ६ ते १२ वयोगटातील मुलांसाठी शेंगदाण्याच्या आकारइतकी टूथपेस्ट वापरावी.
  6. दातांच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी असलेले प्रतिबंधात्मक उपाय लहान मुलांच्या दंत चिकित्सकांच्या सल्ल्यानुसारच करावेत.
  7. दात तुटणे किंवा तशा काही समस्या असल्यास लहान मुलांच्या दंत चिकित्सकांना दाखवणे. विशेष म्हणजे तुटलेला दात दुधात बुडवून तो डॉक्टरांकडे नेणे.
  8. फिलिंग, रूट कॅनल, कॅप बसवणे असे काही उपचार दुधाच्या दातांवरही करणं शक्य असतं आणि ते लहान मुलांच्या दंत चिकित्सकांच्या सल्ल्यानुसारच करणे.
  9. मुलांच्या दातांना तार (ब्रेसस) लावण्याचं योग्य वय हे १२ ते १३ वर्ष आहे
  10. मुलांना दातांच्या समस्या नसल्या तरी दंत चिकित्सकांकडून प्रत्येकी ६ महिन्यांनी दातांची नियमित तपासणी करून घेणे. ज्यामुळे भविष्यात काही समस्या उद्भवणार असल्यास त्याचं निदा वेळेत होईल आणि उपचारामधील गुंतागुंत टाळता येईल.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here