ऑस्टिओपोरोसिस: लवकर ओळखाल तर लवकर बरे व्हाल

भारतातल्या जवळपास २५ लाख लोकांना हाडांच्या संदर्भातील ऑस्टिओपोरोसिस हा आजार असल्याचा अंदाज आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा आजार जर वेळीच ओळखला तर उपचारांचा फायदा अधिक होईल. पुण्यातील एका ७६ वर्षांच्या आजींना असाच अनुभव आला.

0
259
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पाठीच्या दुखण्यामुळे पुण्यातील लांडगे आजी हालचाल करु शकत नव्हत्या. त्या ३ महिन्यांपासून अंथरुणाला खिळून होत्या. जेव्हा त्यांच्या सगळ्या चाचण्या केल्या तेव्हा त्यांना ऑस्टिओपोरोसिस हा आजार असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या बऱ्या होऊन घरी गेल्या. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, त्यांना जर लवकर रुग्णालयात आणलं असतं तर त्यांना इतक्या वेळ यातना सहन कराव्या लागल्या नसत्या.

“या आजींना ऑस्टिओपोरोसिस हा आजार होता आणि यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्यावर परिणाम झाला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी फिजिओथेरपी घेतली आणि काही काळ त्या वॉकरच्या मदतीनं चालल्या,”असं रुबी हॉल रुग्णालयातील स्पाईन सर्जन डॉ. हृषीकेश मेहता यांनी सांगितलं.

Insert (10)

आपल्या दुखण्याविषयी बोलताना लांडगे आजींनी सांगितलं की, “मला माझ्या पाठीच्या दुखण्याचा फार कंटाळा आला होता. मी खूप औषधं घेतली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.”

डॉ. मेहता पुढे म्हणतात की, “आपण सगळेच आपल्या हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हाडं आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असून हाडांच्या फीटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑस्टियोपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होतात आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण फार जास्त आहे. ज्या महिला ६० वर्षांच्या पुढे आहेत आणि जे पुरुष ६५ वर्षांच्या पुढे आहेत त्या व्यक्तींनी बोन मिनरल डेंसिटीची तपासणी दोन वर्षातून एकदा करून घेणं गरजेचं आहे.”

ऑस्टियोपोरोसिसचा धोका कोणाला

 • वृद्ध व्यक्ती
 • महिला
 • १९ पेक्षा कमी बॉडी मांस इंडेक्स असणाऱ्या व्यक्ती
 • धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती
 • मद्यपान करणाऱ्या व्यक्ती
 • सांधेदुखी, स्पॉन्डिलायटीस, हायपरथायरॉडीझम यांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती
 • केमथेरेपी झालेले रूग्ण
 • लवकर रजोनिवृत्ती आलेल्या महिला

ऑस्टियोपोरोसिसला दूर कसं ठेवाल 

 • कॅल्शियम आणि व्हिटॅमीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा
 • दररोज व्यायाम करा
 • आठवड्यातून ५ वेळा जवळपास ३० मिनिटं पायी चाला
 • धुम्रपान करू नका
 • मद्यपानाचं प्रमाण कमी करा
 • वर्षातून एकदा व्हिटॅमीन डीची तपासणी करा
 • ज्या महिला ६० वर्षांच्या पुढे आहेत आणि जे पुरुष ६५ वर्षांच्या पुढे आहेत त्या व्यक्तींनी बोन मिनरल डेंसिटीची तपासणी दोन वर्षातून एकदा करावी.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter