50 टक्के मधुमेहग्रस्त भारतीय आजाराबाबत अनभिज्ञ

भारतातील 50 टक्के नागरिकांना त्यांना मधुमेह असल्याची माहितीच नाही, अशी धक्कादायक बाब भारतात मधुमेहाबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आली आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारतातील 50 टक्के नागरिकांना त्यांना मधुमेह असल्याची माहितीच नाही, अशी धक्कादायक बाब भारतात मधुमेहाबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आली आहे. बीएमसी मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (PHFI), हार्वर्ड टी. ए. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, मद्रास डायबेटिज रिसर्च फाऊंडेशन, हिल्डबर्ग इन्स्टिट्युट ऑफ ग्लोबल हेल्थ, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघम आणि युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगनच्या संशोधकांनी हे संशोधन केलं.

संशोधकांनी 2015-16 साली झालेल्या नॅशनल हेल्थ अँड फॅमिली सर्व्हेचा आधार घेतला. यामध्ये देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशील 15 ते 49 वयोगटाच्या 7,29,829 नागरिकांचा समावेश होता.

संशोधकांना दिसून आलं की,

  • 52.5 टक्के लोकांना माहिती आहे की त्यांना मधुमेह आहे
  • 10 पैकी 4 म्हणजे 40.5 टक्के लोकं सध्या औषधं घेत आहेत
  • 4 पैकी एका व्यक्तीचा म्हणजे 20.4 टक्के लोकांचा मधुमेह नियंत्रणात आहे
  • ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्ती, पुरुष आणि गरीब, कमी शिकलेल्या लोकांमध्ये आवश्यक ती काळजी घेण्याचं प्रमाण कमी दिसून आलं
  • 15 ते 49 वयोगटातील फक्त 20.8 टक्के मधुमेहग्रस्त पुरुष आणि 29.6 टक्के मधुमेहग्रस्त महिलांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे
  • 15 ते 49 वयगोटातील मधुमेहग्रस्तांना त्यांना हायपरटेंशन असल्याचं माहिती नाही
  • दमण आणि दिवमध्ये जनजागृती, उपचार आणि नियंत्रणाचं प्रमाण अनुक्रमे 5.5 टक्के, 5.3 टक्के आणि 2.1 टक्के आहे
  • तर मेघालयात जनजागृती, उपचार आणि नियंत्रणाचं प्रमाण सर्वात जास्त अनुक्रमे 69.6 टक्के, 60.9 टक्के आणि 53.7 टक्के आहे
  • 30 मुख्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा दर 30 टक्के आहे

संशोधनाचे अभ्यास डॉ. आशिष अवस्थी म्हणाले, “मधुमेह हे भारतासमोरील आव्हान आहे आणि हृदयरक्तवाहिन्यांमुळे होणारा मृत्यू आणि किडनी फेलरला कारणीभूत ठरत आहे. मधुमेह आणि हायपरटेंशन एकत्रितरित्या असण आणि त्याबाबत जनजागृती, उपचार आणि नियंत्रण याबाबत असलेली कमतरता लक्षा घेता सुरुवातीलाच प्रतिबंध आणि तपासणी यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)