डॉक्टरांसाठी: आता कर्करोगासंबंधी प्रशिक्षण घ्या ऑनलाईन

तोंडाच्या कर्करूग्णांची संख्या सध्या प्रकर्षाने वाढताना दिसून येत आहे. कर्करोगासंदर्भात आजही समाजात जागरूकतेचा अभाव आहे. कर्करोगाचं लवकर निदान व योग्य उपचार व्हावेत या अनुषंगाने राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

0
220
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

देशात कर्करुग्णांची संख्या वाढताना दिसत असून दरवर्षी १० लाख नवीन रुग्णांची नोंद करण्यात येते. इतकंच नाहीतर या आजारावर वेळेवर उपचार न मिळाल्यास दरवर्षी ५ लाख रुग्णांना जीव गमवावा लागतो. यात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वांधिक आहे. ८० टक्के रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे उशीरा निदान होणे हा आहे. तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असून तोंडाचा कर्करोग महिलांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षित डॉक्टरांना किंवा पोस्ट गॅज्युएट विद्यार्थ्यांना इतकंच नाहीतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना कर्करोगासंदर्भात शिक्षण देण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. याकरता आता प्रशिक्षित डॉक्टरांना ऑनलाईन पद्धतीने कर्करोगाचे प्रशिक्षण दिले जाईल.

पदव्युत्तर व पदवीधर डॉक्टरांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार व टाटा मेमोरिअल रुग्णालयाने मिळून ‘अफोरडेबल कॅन्सर केअर’ या प्रकल्पातंर्गत देशभरातील डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याच्या हेतूने ‘ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरियल सिरीज’ सुरू केलीयं. या सिरिजद्वारे नवोदित डॉक्टरांना कर्करोगाचे निदान व उपचार याबाबत प्रशिक्षण दिले जाईल.

शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात या ‘ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरियल सिरीज’चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश पवार, टाटा मेमोरिअल रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक प्रा. डॉ. पंकज चतुवर्दी, डॉ. कैलाश शर्मा याप्रसंगी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत म्हणाले की, “कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टरांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे ही ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. ही एक प्रकारची मोहीम असणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रुग्णाचे निदान व उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत प्रकरणे पाहून कर्करोगाची पूर्वलक्षणे दिसून आल्यास त्या रुग्णांवर तातडीने पुढील उपचार केले जातील.”

या वेब सिरीजबाबत बोलताना टाटा कर्करोग रुग्णालयातील डोके व मान कर्करोग विभागाचे प्रा. डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले की, “सध्याच्या तरुण पिढी फक्त वर्गात शिक्षण जे शिकवतात त्यावरच अधिक भर देतात. अवांत वाचन करत नाहीत. परंतु, वैद्यकीय क्षेत्रात दररोज काहीना काही नवीन घडंत असतं. नवीन आजारांचे निदान होतं असतं. पण विद्यार्थ्यांना याबाबत अभ्यासच नसतो. या कारणास्तव वैद्यकीय शिक्षणासह प्रॉक्टिकल नॉलेजही त्यांना मिळावेत, याकरता ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.”

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रशिक्षणाला सुरूवात केली जाईल. दर शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांना १० ते १५ मिनिटे व्हिडिओ कॉन्सफन्सिंगद्वारे कर्करोग तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. इतकंच नाहीतर या विद्यार्थांना असायमेंट सुद्धा दिली जाईल.

“कर्करोगाच्या शरीरातील वेगवेगळ्या जागा व उपजागांवर आधारित अभ्याक्रम सात आठवड्यांचा वेगवेगळ्या मॉड्यूलसह तयार केलेला आहे. व्हिडिओ व्याख्यान, केस स्टडी, प्रश्नावली असा अभ्यासक्रमाचा समावेश असेल. विशेष म्हणजेः डॉक्टरांना स्मार्टफोनद्वारे किंवा कॉम्युटरद्वारे कधीही मोकळ्या वेळेत हे व्हिडिओ पाहून स्वतः शिकण्याचा अनुभव घेऊ शकतील,” असे डॉ. चतुर्वेदी म्हणाले.

ही वेबसाईट आहे. यावरून कर्करोग तज्ज्ञांचे सल्ला व प्रशिक्षण डॉक्टरांना घेता येईल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter