रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी अवयवदानाचे धडे

अवयवदानामुळे आठ गरजू रुग्णांच प्राण वाचवता येऊ शकतं. यासाठी ‘’स्वर्गात हवं स्थान...तर करा, अवयवदान...’’ असा संदेश नागरिकांना देत आता मुंबईतील रेल्वे स्थानकात अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येतेय. मुंबईतील पश्चिम रेल्वे स्थानकावरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल याठिकाणी पोस्टर्सच्या माध्यमातून लोकांना अवयवदानाबाबत जागरूक करण्यात आलं.

0
93
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अवयव मिळत नसल्याने अनेक रुग्ण वर्षांनुवर्ष अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. या लोकांना तातडीने अवयव उपलब्ध व्हावेत याकरता दात्यांच्या संख्येत वाढ होणं गरजेचं आहे. यासाठी अवयवदानासंदर्भात विविध स्तरांवर जागरूकता निर्माण करण्यात येते. म्हणूनच राजहंस प्रतिष्ठानाने पुढाकार घेत अवयवदानासंदर्भातील जनजागृतीचा उपक्रम राबवलाय.

39ab80d1-8739-4065-85ad-0b5b61d682df

यासाठी तरूणाईने पुढाकार घेत या उपक्रमाअंतर्गत सोमवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकात अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं. शिवाय १७ जानेवारीला मालाड आणि गोरेगाव स्थानकावर अवयदानासंदर्भात जनजागृती करण्यात येणारे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना राजहंस प्रतिष्ठानचे प्रमुख श्रीकांत आपटे यांनी सांगितलं की, “अवयव निकामी झाल्याने होणारे मृत्यू, आजारी व्यक्तींना समाजात वावरताना होणारा त्रास पाहून अवयवदान चळवळीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून चार वर्ष याकरता काम करतोय. मात्र, अंधश्रद्धेमुळे अद्यापही लोकं अवयवदान करण्यास पुढाकार घेत नाहीयेत. सध्याच्या तरुणाईंमध्ये अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी के.सी महाविद्यालयातील एनएसएस विद्यार्थ्यांना हातीशी घेऊन रेल्वे स्थानकात अवयवदानासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतोय.”

a672f922-7225-41b1-8040-61eb8ef6e889

कमी प्रमाणात अवयव उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. पण जास्तीत जास्त लोकांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यास हे चित्र बदलेल. चर्चगेट स्थानकात के.सी. महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं अवयवदानाबाबत जागृती करण्यात आली.

“आम्हाला रेल्वेच्या सर्व स्थानकात अवयवदानाचं पोस्टर व संदेश द्यायचे होतं. मात्र गर्दी वाढेल म्हणून पश्चिम रेल्वेवरील २५ स्थानकांपैकी अवघ्या चार स्थानकांवरच परवानगी मिळाली आहे. हळुहळू सर्व स्थानकावर ही परवानगी दिली जाईल,” असंही आपटे यांनी सांगितलं.

fff6001e-36b5-471c-b648-1dd4f29ed539 2d2a23e5-64b8-43dc-bfb2-efbea3d0e6da

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter