कॅन्सरवरील औषधं-चाचण्या WHOच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत

जागतिक आरोग्य संघटनेनं अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर केली. या यादीत 5 प्रकारच्या कॅन्सरवरील औषधं आणि कॅन्सरसाठी आवश्यक असलेल्या 12 वैद्यकीय चाचण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

0
208
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • कॅन्सरवरील औषधं-चाचण्या WHOच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत
  • जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली अत्यावश्यक औषधांची यादी
  • 5 कॅन्सरवरील औषधं,  कॅन्सरसाठी आवश्यक 12 प्रकारच्या चाचण्यांचा समावेश

कॅन्सरग्रस्तांवरील औषधांच्या खर्चाचा भार कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारनं कर्करोगाच्या औषधांवरील ट्रेड मार्जिन कमी केली आणि आता जागतिक आरोग्य संघटनेनं कॅन्सरवरील औषधं आणि कॅन्सरसाठी आवश्यक चाचण्यांचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत एकूण 460 औषधं आणि 69 वैद्यकीय चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये त्वचा, फुफ्फुस, मूत्राशय, रक्त आणि बोनमॅरो या 5 प्रकारच्या कॅन्सरवरील औषधांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. तसंच कोलोरेक्टल, यकृत, गर्भाशय, प्रोस्टेट, स्तन, लिम्फोमा आणि ल्युकेमिया या कॅन्सरसाठी आवश्यक विविध 12 चाचण्यांही अत्यावश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल डॉ. टेड्रॉस अधेनॉम घेब्रेसेस म्हणाले, “जगभरात 150 पेक्षा जास्त देश जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीचा आधार घेतात. ही यादी आम्ही नव्यानं तयार केली आहे. ज्यात कॅन्सरच्या औषधांचा समावेश केला आहे. कॅन्सरग्रस्तांना जगवण्यासाठी आवश्यक असलेली ही औषधं सर्वांनाच परवडायला हवीत”

यासंदर्भात ‘माय मेडिकल मंत्रा’ शी बोलताना कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीएए)च्या नीता मोरे यांनी सांगितलं की, ‘‘कॅन्सरग्रस्तांना उपचारांवर लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. आमच्याकडे येणारे सर्व रुग्ण हे सरकारी आणि पालिका रुग्णालयातून येतात. सगळ्यांनाच हा खर्च पेलवत नाही. पण आता जागतिक आरोग्य संघटनेनं कॅन्सरवरील औषधं आणि चाचण्यांना अत्यावश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. यामुळे रुग्णांनाच उपचारात दिलासा मिळणार आहे. याशिवाय आम्हालाही काम करणं अधिक सोपं होईल’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter