वर्षापर्यंत बाळाचा आहार कसा असावा!

बाळाच्या जन्मानंतर 6 महिने त्याला स्तनपान द्यावं लागतं. मात्र त्यानंतर बाळाचा आहार कसा असावा याबाबत अनेकांना माहिती नसते. यासाठी पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमधील निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख याबाबत माहिती दिलीये.

0
418
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

घरात नवीन बाळ आलं की प्रत्येकजण त्याला काय हवं नको ते पाहतात. मात्र आईला एक गोष्ट आईला माहित नसते की म्हणजे बाळाचा नेमका आहार कसा असावा. इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी माहिती अपूर्ण असते. अशावेळी फॉर्म्युला दूध किंवा बाटलीने बाळांना दूध पाजलं जातं. मात्र आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असते आणि बाटलीने दूध पाजल्याने दीर्घकालीन परिणाम होतात.

स्तनपान ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर तासाभरात आईने स्तनपान सुरू केलं पाहिजे. बाळाच्या जन्मानंतर ३ ते ५ दिवसांपर्यंत येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रम ही बाळाने घ्यावयाची पहिली लस असते. त्यामुळे बाळाने हे दूध पिणं आवश्यक आहे. या दूधामुळे बाळाचे अनेक गंभीर संसर्गांपासून संरक्षण होतं.

बाळासाठी स्तनपान हे पूर्णान्न असते आणि पहिले सहा महिने बाळाला पाण्याचीही आवश्यकता भासत नाही. त्यामुळेच युनिसेफ, डब्ल्यूएचओ आणि आरोग्यविषयक सर्व महत्त्वाच्या संस्था बाळाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान देण्याची शिफारस करतात. संशोधनानुसार, ज्या बाळांनी पहिले सहा महिने केवळ स्तनपान केले आहे त्यांना न्युमोनिया, अॅलर्जी, पोटाला आतड्याला आणि श्वसनमार्गाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते आणि ते अधिक बुद्धिमान असतात. स्तनपान मातांसाठीही चांगले असते कारण गरोदरपणात साचलेली अतिरिक्त चरबी दुधावाटे बाहेर पाडते आणि स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी असते.

असे असले तरी बाळ ६ महिन्यांचं झाल्यावर बाळाला केवळ स्तनपान पुरत नाही. त्याची दैनंदिन आहाराची गरज भागवण्यासाठी इतर पदार्थांचीही आवश्यकता भासते. 6 महिन्यांनंतर स्तनपानासह बाळाला पूरक अन्न जसं की वरण-भात, खिचडी, भाज्या घालून केलेली खिचडी, भरड. हे पूरक पदार्थ घरी तयार केलेलं, ताजे आणि पूर्ण शिजलेलं असावेत आणि प्युरीच्या प्रकारात द्यावं.

सुरुवातीला जेवण दिवसातून दोन वेळा द्यावं त्यानंतर जसजसं वय वाढत जाईल तसंतसं दिवसातून ३ ते ४ वेळा जेवण द्यावं. २ वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तनपान सुरू ठेवावं. अंड्याचा पांढरा भाग आणि गायीचं दूध हे बहुधा ९ ते १२ महिन्यांदरम्यान सुरू करावं. ते लवकर केलं असता बाळाला अॅलर्जी होण्याची शक्यता असतं. खूप द्रव पदार्थ म्हणजे डाळीचे पाणी, भाताची पेज, फळांचा रस देणं टाळावं कारण त्यामुळे बाळाला पुरेसे तंतू मिळत नाहीत. चणे/सुका मेवा हेसुद्धा पावडरच्या रुपात अथवा शिजवून द्यावेत. नवजात बालकाच्या आहारात साखर, मीठ आणि मसाले अत्यंत कमी प्रमाणात घालावं.

बाळांना बिस्कीट आणि दूधंही भरवलं जातं. मात्र हे बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण यामध्ये क्षार, मायक्रो न्युट्रिअंट्स आणि तंतु समाविष्ट नसतात. त्यामुळे लोहाची कमतरता आणि बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते.

वयानुसार द्यायचा आहार

पहिले सहा महिने केवळ स्तनपान

६ ते ७ महिने – लिक्विड आणि सेमी सॉलिड डाळी, भरड, भाज्यांचे सूप (गाळून)

८ ते ९ महिने – भाताची खीर, उकडलेला बटाटा, बीटरूट आणि गाजराचं सूप, हंगामी फळं,  इडली, उपमा

१०-१२ महिने – अंड्याचा बलक आणि भात, भाज्यांचं सूप, ज्वारीचं आंबील, ओट्स, नाचणी

१२-२४ महिने – विविध पीठांचा पराठा/घावण, थालीपीठ, कढी

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter