…म्हणून पैशांचं पाकीट मागच्या शिखात ठेऊ नका

पुरूषांनी पैशांचं पाकीट मागच्या शिखात ठेवल्यानंतर त्यांची नेहमीप्रमाणे बसण्याची पद्धत बदलते. याचा परिणाम पाठ, हिप, नेक यावर होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पैशांचंं पाकीट मागच्या खिशात न ठेवता पुढच्या खिशात ठेवावं. जेणेकरून पाठ आणि हिपला त्रास होणार नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सावधान! पैशांचं पाकीट पॅंटच्या मागच्या शिखात ठेऊ नका…आता तुम्हाला वाटेल गर्दीत कोणीतरी मागच्या खिशातून पाकीट मारेल यासाठी आम्ही हे सांगतोय…मात्र हे वाक्य आम्ही नाही तर डॉक्टर तुम्हाला सांगतायत…पडला ना प्रश्न…याचं कारण असं की, मागच्या खिशात पैशांचं पाकीट ठेवल्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पुरुषांच्या पैशांच्या पाकीट अनेक वस्तू ठेवल्याने ते जाड आणि मोठ होतं. हे पाकीट मागच्या शिखात ठेवल्यानंतर पुरुषांची नेहमीप्रमाणे बसण्याची पद्धत बदलते. याचा परिणाम पाठ, हिप, नेक यावर होतो.

यासंदर्भात पुण्याच्या साई-स्नेह रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक डॉ. गणेश जगदाळे यांच्या सांगण्यानुसार, “आजकाल अनेकजण पैशांचं पाकीट मागच्या खिशात ठेवतात. मात्र यामुळे पाठीचा मणका आणि हिपला त्रास होऊ शकतो. कारण विसिटींग आणि बँकांच्या कार्डमुळे पाकीट जाड होतं. जाड पाकिट खिशात ठेऊन बसल्याने पाठीच्या मणक्याचा आकार बदलतो आणि लो बॅक पेनचा त्रास होतो. तर हिपच्या जवळच्या भागात ‘बर्सा’ हा गादीसारखा एक प्रकार असतो. अशा पद्धतीच्या बसण्यामुळे या गादीवर प्रेशर येऊन सूज येते. याला बर्सायटीस असं म्हणतात. पण यामुळे होणारे त्रास अधिक गंभीर नसून उपचारांनी ते बरे होतात.”

तर देवयानी रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीरंग लिमये माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाले की, “जाड पाकीट खिशात ठेवल्यास बसल्यानंतर हिपवर प्रेशर येतं. त्यामुळे हिपच्या भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळेे पायाला मुंग्या येणं, पाय बधिर होणं या समस्या जाणवतात. काहीवेळा समस्या गंभीर होऊन हिप फेल होण्याची देखील शक्यता असते. शिवाय पाठीला सुद्धा त्रास होऊन पाठदुखीची तक्रार उद्भवते.”

म्हणून प्रत्येकाने शक्यतो पैशांचंं पाकीट मागच्या खिशात न ठेवता पुढच्या खिशात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. दीर्घकाळ जर तुम्ही मागच्या खिशात पैशांचं पाकीट घेऊन बसत असाल तर ते तुमच्या पाठीच्या कण्याला आणि हिपला त्रासदायक ठरू शकतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter