“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”

होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे भारतीय उपचार पद्धतींसाठीही राष्ट्रीय आयोग स्थापन करावं, अशी मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदेंनी केलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

होमिओपॅथीचा कारभार आतापर्यंत होमिओपॅथी सेंट्रल काऊन्सिलच्या हातात होता. मात्र या संस्थेविरोधात केंद्र सरकारकडे अनेक तक्रारी आल्या. भ्रष्टाचार, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव, त्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर होणारा दुष्परिणाम अशा अनेक तक्रारींचा यात समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं हे काऊन्सिलच बरखास्त केलं आणि त्याजागी एक वर्षासाठी बोर्ड ऑफ गव्हर्नसची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

होमिओपॅथी औषधं घेताय? ही पथ्यं पाळा..
सोर्स- Cupping Resource

या विधेयकावरील चर्चेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही सहभागी होते. होमिओपॅथीसह अन्य भारतीय उपचार पद्धतींसाठी देखील राष्ट्रीय आयोग स्थापन करावा. वैद्यकीय शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी आणि दर्जानिश्चितीसाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावीत, वैद्यकीय शिक्षण संस्थांना परवानगी देणारी आणि त्यांचे मूल्यमापन करणारी संस्था वेगवेगळी असावी, अशा मागण्या खा. डॉ. शिंदे यांनी केल्या.

अॅलोपॅथीसाठी केंद्र सरकार आणत असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर ८० टक्के सदस्य हे केंद्राने नियुक्त केलेले असणे प्रस्तावित आहे. त्याला देशभरातील डॉक्टरांचा आणि त्यांच्या संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे त्या आयोगावरही अधिकाधिक प्रतिनिधी हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडलेले असावेत आणि भारतीय उपचार पद्धतींसाठीही निवडणुकीच्या माध्यमातून निवडलेल्या प्रतिनिधींचाच राष्ट्रीय आयोग स्थापन केला जावा, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter