अतिझोपेच्या आजाराशी त्याचा लढा

नॅक्रोलेप्सी, म्हणजेच अतिझोप येणे हा देखील एक आजार आहे. जगभरातील फक्त ०.०२ टक्के लोकंचं या आजाराने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या म्हण्याप्रमाणे हा आजार बरा होणारा नाही, पण जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहार यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आई खूप झोप येतेय, थोडावेळ झोपू दे. रोज सकाळी उठताना नकळत आपल्या तोंडून हे वाक्य निघतंच. कारण आपली झोप पूर्णच होतच नाही. खूप काम केल्याने येणारा थकवा, मानसिक तणाव किंवा इतर कारणांमुळे जास्त झोपावसं वाटतं. पण, म्हणून काही आपण १४ ते १६ तास झोपत नाही. झोपेला काही मर्यादा असते, मात्र २६ वर्षीय मोहीत मोरे याला अपवाद आहे.

तुम्हाला खरं वाटणार नाही पण मोहीत दिवसातले चक्क १४ ते १६ तास झोपायचा. त्याच्या कुंटुंबियांना तसेच त्यांच्या मित्रांना सर्वांना माहित आहे की मोहीतला अतिप्रमाणात झोप येते. मोहीतला झोप अनावर व्हायची. इतकी झोप यायची की लोकं त्याला आळशी समजत होते.

मोहीत नोकरीला लागल्यावर देखील त्याला ही झोपेची समस्या सतावत होती.  अशावेळी तो ऑफीसमध्ये देखील झोपत असे. काहीवेळा तो त्याच्या वरिष्ठांच्या समोर देखील झोपत असे. मात्र एकंदरीत त्याचं काम पाहता वरिष्ठांनी त्याला कधी आळशी म्हंटलं नाही. उलट मोहीतच्या या झोप येण्याच्या समस्येसाठी त्याला डॉक्टरांकडे जाण्यास सांगितलं.

डॉक्टरांकडून मोहीतला ‘नॅक्रोलेप्सी’ असल्याचं निदान केलं. नॅक्रोलेप्सी हा फार दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसॉर्डर (आजार) आहे. या समस्येमध्ये व्यक्तीचं झोपेच्या चक्रावर नियंत्रण राहत नाही. शिवाय या समस्येमध्ये रूग्णाला कोणत्याही क्षणी झोप येण्याची शक्यता असते. हा आजार बरा होण्यासारखा नाहीये.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना मोहीत सांगतो की, “मी १३ वर्षांचा असताना मला स्लीप अटॅक आला होता. त्यावेळी माझ्या कुटुंबियांना वाटलं की, मी आळशी असल्यामुळे मला जास्त वेळ झोप येते. जेव्हा मला नॅक्रोलेप्सीचं निदान झालं तेव्हा मला एकूण परिस्थितीची जाणीव झाली.”

मोहित पुढे सांगतो, “जेव्हा मला डॉक्टरांनी या आजाराचं नाव सांगितलं तेव्हा मी ते लिहून घेतलं कारण मला त्याबदद्ल काहीच माहित नव्हतं. मला ऐकून धक्का बसला जेव्हा मला कळलं की, हा आजार बरा होण्यासारखा नाही. त्यावेळी मी फार रडलो होतो.”

महितला २०१५मध्ये ‘नॅक्रोलेप्सी’ हा आजार असल्याचं निदान झालं. त्यानंतर जवळपास गेली दोन वर्ष मोहित या आजाराशी मुकाबला करतोय.

याविषयी अधिक माहिती देताना जुनो क्लनिकचे डॉ. मिलन बालक्रिश्नन सांगतात की, “नॅक्रोलेप्सी हा दुर्मिळ आजार आहे. संपूर्ण जगभरात ०.०२ टक्के लोकं या आजाराने त्रस्त आहेत. जेव्हा रूग्णाला एखाद्या आजाराची लक्षणं जाणवू लागतात तेव्हा त्यावर मात करणं सोपं जातं. आजाराचं निदान होणं हे जास्त महत्त्वाचं असतं.” मोहीतच्या प्रकरणामध्ये या आजाराचं निदान होण्यास ४ महिने लागले.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना मानसोपचातज्ज्ञ सागर मुंदडा सांगतात की, “हा आजार बरा होऊ शकत नाही. मात्र जीवनशैलीत काही बदल केल्याने यावर नियंत्रण ठेवता येतं. शिवाय यासाठी नियमित दिनक्रम आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे.”

मोहीत पुढे सांगतो की, “या आजारामुळे माझं ब्रेक अप देखील झालं. माझ्या गर्लफ्रेंडला मी फार आळशी आहे असं वाटू लागलेलं. जेव्हा तुम्ही दिवसातून १६ तास झोपता तेव्हा तुमच्या मनात एक विचित्र भावना निर्माण होते. मात्र या आजारमुळे माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि यामधून मी बरंच काही शिकलो.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter