तोंडाचा कॅन्सर – समज आणि गैरसमज

वाशीतल्या हिरानंदानी रुग्णालयातील कन्सलटंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. डोनल्ड  बाबू यांनी समज आणि तथ्य याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

0
517
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पेशींची अनियंत्रित वाढ होऊन आजूबाजूच्या इतर टिश्यूंवर त्या हल्ला करतात आणि त्यांना हानी पोहोचवणे, अशी कॅन्सरची व्याख्या केली जाते. तोंडाच्या कॅन्सरमध्ये तोंडात एखाद्या जखमेची वाढ होते, त्यात वेदना होतात. या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. तोंडाचा कॅन्सर हा भारतातील पहिल्या 3 कॅन्सरपैकी एक आहे. पुरुषांमध्ये असलेल्या कॅन्सरमध्ये तोंडाचा कॅन्सर पहिल्या क्रमांकावर आहे. तर महिलांच्या कॅन्सरमध्ये तोंडाचा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आपल्याला कॅन्सरसारखा आजार आहे  याचा स्वीकार करणे आणि कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेणे ही योग्य उपचाराच्या दिशेनं सकारात्मक पावलं आहेत. समस्येकडे दुर्लक्ष करणे किंवा अंदाजे स्वतच काहीतरी निदान करणे,  सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा इंटरनेटवरून मिळणाऱ्या माहितीवर जास्त अवलंबून राहणे, आपण जो विचार करत आहोत तोच बरोबर आहे, अशा मानवी मानसिकतेमुळे ही समस्या गंभीर होते. त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरबाबतचे तथ्य आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

गैरसमज – मी तरुण असल्यानं मला तोंडाचा कॅन्सर होणार नाही

तथ्य – कॅन्सरला वय नसतं, त्याला फक्त etiological agent कारणीभूत असतात. जसं तंबाखूचं सेवन कोणत्याही वयात केलं जातं, तसं कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो.

गैरसमज फक्त धूम्रपानामुळे तोंडाचा कॅन्सर होतो

तथ्य – तोंडाचा कॅन्सर हा धूम्रपान, मद्यपान, शार्प टीथ, मसाले, लैंगिक संबंधातून होणारे आजार, सिंड्रोम (आनुवंशिक आजार) या गोष्टींमुळे होऊ शकतो. शिवाय आता वेपिंग, हुक्का यासारख्या इतर गोष्टीही तोंडाचा कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत आहेत.

गैरसमजवेदना होत नाही, तर मला काळजी करण्याची गरज नाही.

तथ्य – अनेक लोकांना वाटतं की वेदना हे कॅन्सरचं लक्षण आहे. काही वेळा कॅन्सरच्या जखमेला वेदना होत नाही. त्यामुळे नियमित तपासणी गरजेची आहे. विशेषत जर तुम्ही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करत असाल तर तपासणी करायलाच हवी.

गैरसमजमाझ्या कुटुंबातील सदस्यांना तोंडाचा कॅन्सर असल्यास मलादेखील होईल

तथ्य – कौटुंबिक इतिहास तोंडाचा कॅन्सर होण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुमच्या कुटुंबात कुणाला तोंडाचा कॅन्सर असेल, तर तुम्ही तुमची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. मात्र तोंडाचा कॅन्सर हा आनुवंशिक नाही, तो बहुधा तंबाखू सेवनानं बळावतो. त्यामुळे सकस आहार घ्या, तंबाखूचं सेवन टाळणे आणि मद्यपान कमी करणे अशा काही गोष्टी केल्यास तोंडाच्या कॅन्सरचा धोका टाळू शकता.

लवकर निदान होणं का गरजेचं आहे

  • पूर्णपणे बरा होण्याची खात्री मिळते
  • लवकर निदान झाल्यास व्रण राहतील अशा प्रक्रियांचे उपचार कमी होतात
  • शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरवर जास्तीत जास्त शस्त्रक्रिया कराव्या लागतात
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter