मुंबईकरांमध्ये वाढतेय ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता

तीनपैकी दोन मुंबईकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून आलीये. शरीरातलं 'ड' जीवनसत्व कमी झालं तर मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोग यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. ८० टक्के मुंबईकरांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असल्याची माहिती संशोधनात समोर आलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

चाकावर धावणारं शहर अशीच मुंबई शहराची ओळख आहे. या शहरात पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्ती काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. अशा या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याकडे मात्र त्याचे नकळतच दुर्लक्ष होतं. वेळेवर निदान व उपचार न झाल्याने आजार बळावतो. मुंबईत साधारणतः ८० टक्के लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता आहे, असं एका संशोधनात आढळून आलंय.

हाडांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी कॅल्शियम महत्त्वाचं असतं. हे कॅल्शियम पालेभाज्यांद्वारे मिळते. पण ते हाडांमध्ये शोषले जात नाहीत. त्यामुळे हे कॅल्शियम हाडांना योग्य त्या प्रकारे शोषता यावे यासाठी जो घटक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे ‘ड’ जीवनसत्व.

‘ड’ जीवनसत्वामुळे आरोग्याशी संबंधित विविध आजारांवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. कारण ‘ड’ जीवनसत्व रक्तातील सारखेचं प्रमाणही नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे टाईप-१ मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या विविध आजार होत नाहीत, असे वच्चन आरोग्याच्या सह-संस्थापक व संचालक अंकिता घाग यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाले की, शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची मात्रा किती आहे हे जाणून घेण्यासाठी रक्तचाचणी फायदेशीर ठरते. मुळात सध्या वयोवृद्धांप्रमाणे लहान मुलांमध्येही या जीवनसत्वाची कमी जाणवू लागली आहे. त्यामुळे कोवळ्या उन्हात उभे राहणे गरजेचे असून त्यामुळे शरीराला ‘ड’ जीवनसत्व मिळतं. मुळात, सूर्य किरणांसह दुग्धजन्य पदार्थ, मासे, हिरव्या पालेभाज्या, चीज व बटर या पदार्थांचे सेवन करावे. याचसोबच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधही घ्यावेत. जेणेकरून व्यक्तीच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्वांची कमतरता भरून काढता येऊ शकेल.

हाडांच्या समस्या सुरू झाल्या की खरं तर कॅल्शियमचे शरीरातील प्रमाण मोजायला हवं, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

हाडे दुखत असल्याची तक्रारी घेऊन अनेक जण येतात. साधारणतः पन्नाशीनंतर हा त्रास सुरू होतो आणि त्यातही विशेषतः स्त्रियांना हा त्रास अधिक होतो. याचे मुख्य कारण शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता हेच आहे, अशी माहिती शीव रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागातील सहाय्यक प्रा. डॉ. अभिजित काळे यांनी दिली.

लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ‘ड’ जीवनसत्वे फायदेशीर ठरते. त्यामुळे लहान मुलांना सकाळी किमान अर्धा तास कोवळ्या उन्हात उभे केले पाहिजे, असे हिंदुजा रुग्णालयातील बाल कर्करोग तज्ज्ञ डॉ. नितीन शहा यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना हर्षा अडवाणी (२३) म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वीच माझ्यात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता असल्याचे कळले. वय लहान असल्याने या आजारासंदर्भात कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे दररोज पहाटे २० मिनिटे सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून शरीराला ‘ड’ जीवनसत्त्व मिळेल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter