काळ आला होता..पण वेळ आली नव्हती…

पश्चिम बंगालमधून मुंबईत नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या, २१ वर्षीय राजेंद्र पालचा भयंकर अपघात झाला. राजेंद्रच्या छाती आणि पोटातून लोखंडी सळी आरपार गेली. राजेंद्र वाचेल का अशी शंका होती. पण दैव बलवत्तर असल्यानं या अपघातातून तो सुखरूप बाहेर आला आहे. सध्या मुंबईतील जी.टी.रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरू आहेत.

0
253
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • त्याच्या कामाचा दुसराच दिवस होता
  • अपघातात गंभीर जखमी झाला
  • छातीत, पोटात घुसली सळी
  • लोखंडी सळी गेली शरीराच्या आरपार
  • २ तास चालली शस्त्रक्रिया
  • छाती, पोटातून काढण्यात आली सळी
  • राजेंद्रच्या महत्त्वाच्या अवयवांना इजा नाही

पश्चिम बंगालमध्ये राहणारा २१ वर्षीय राजेंद्र पाल नोकरीच्या शोधात वीस दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. चुलत भाऊ धन परमार यांच्या ओळखीतूनच राजेंद्रला नरीमन पॉईंटच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी मिळाली.

860dd551-f385-4903-9216-e87a05d3b234

जेमतेम दोन-तीन दिवसच झाले असतील तर राजेंद्रचा भयंकर अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी कामाच्या ठिकाणी फिरत असताना राजेंद्र पाय घसरून इमारतीच्या बेसमेटमध्ये पडला. या अपघातात त्याच्या पोटात आणि छातीत सळी घुसली. इतर कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पोलीस व अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला वर काढलं.

मुंबईतील जी.टी.रुग्णालयात रातोरात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी या सळया काढून त्याला नव्यानं जीवदान दिलं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राला माहिती देताना राजेंद्र पाल यांचा चुलत भाऊ धन परमार यांनी सांगितलं की, “रात्री साडेआठच्या सुमारास असं झाल्याचं कळलं. राजेंद्रला भेटल्यावर तो माझ्याशी बोलला. नोकरी करण्याची इच्छा असल्याने आम्ही त्याला मुंबईत येण्याची परवानगी दिली. अवघे दोन दिवसचं नोकरीला झाल्यानं आता भीती वाटतंय. कारण नशीब चांगलं होतं म्हणून भावाचा जीव वाचला.”

इमारतीचं बांधकामाचं काम करणारे सुपरवायर्झर रविंद्र नायडू यांनी सांगितलं की, “नरिमन पाईंट येथील फ्री-प्रेस इमारतीच्या समोर ही घटना घडली. एका कामगाराने याबाबत मला माहिती दिली. पोलिसांना मदतीसाठी कॉल केल्यानंतर ते तातडीनं याठिकाणी आले. राजेंद्रच्या छाती आणि पोटाच्या आरपार सळी घुसली. परंतु, तरीही तो आमच्याशी संवाद साधत होता. बेशुद्ध पडला नव्हता. त्याला दुखतही नव्हतं. रुग्णालयात आणण्यावर डॉक्टरांनाही आश्चर्यच वाटलं. पण तातडीनं त्यावर उपचार करून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले.”

राजेंद्रला पाहून आम्ही खूप घाबरलो होतो की तो वाचेल का? पण त्याच्यात ताकद आणि इच्छाशक्ती प्रचंड असल्यानं तो वाचला, असंही नायडू म्हणाले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter